Shivsena : सत्तार शिवसेनेत कसे आले ? खैरेंनीच सांगितला किस्सा..

पालोदकरांना शिवसेनेत प्रवेश द्यायचे निश्चित झालेले असतांना अचानक हा निर्णय बदलल्याने मलाही धक्का बसला. भाजपने सत्तारची डोकेदुखी नको म्हणून तेव्हा त्याला आमच्याकडे पाठवून दिले. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire-Abdul Sattar
Chandrakant Khaire-Abdul SattarSarkarnama

औरंगाबाद : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापुर्वी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून जनआशिर्वाद यात्रा काढली होती. तेव्हा काॅंग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नव्या पक्षाच्या शोधात होते. भाजपमध्ये जाण्याची त्यांची पुर्ण तयारी देखील झाली होती. अगदी फडणवीस यांच्या जनआशिर्वाद यात्रेच्या वाहनात चढून सत्तार यांनी फडणवीस यांचे जोरदार स्वागत करून जणू आपला भाजपमध्ये प्रवेशच झाला असे चित्र निर्माण केले होते.

तर दुसरीकडे ज्या सत्तारांच्या विरोधात आयुष्यभर लढलो आता त्याच सत्तारांना खांद्यावर घेऊन नाचायचे हे काही मतदारसंघातील पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांना पचनी पडले नाही. (Shivsena) त्यांनी आधी खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे आपला विरोध प्रगट केला, पण सत्तार-दानवे यांची सेटिंग माहित असल्यामुळे इथे न्याय मिळणार नाही हे त्यांना पक्के ठाऊक होते. म्हणून तेव्हा दानवेंना बायपास करून तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी मुंबईत जाऊन फडणवीसांना भेटले होते.

सत्तारांना होणारा टोकाचा विरोध पाहून तेव्हा फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच सत्तारांना शिवसेनेत प्रवेश मिळाल्याच्या चर्चा होत्या. आता तेव्हा नेमकं काय घडलं होतं, सत्तार भाजपमध्ये जाताजाता शिवसेनेत कसे आले याचा किस्साच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितला.

Chandrakant Khaire-Abdul Sattar
लढाईला तयार राहा; उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना लावले कामाला

सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची सगळी तयारी झाली होती, अगदी पहाटे सत्तारांनी फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन घेतलेली भेट देखील तेव्हा चांगलीच चर्चेत होती. सत्तार भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित असतांना इकडे शिवसेनेने सत्तार यांचे कट्टर विरोधक असलेले प्रभाकर पालोदकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्याची तयारी सुरू केली होती.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, प्रभाकर पालोदकर हे आधी सत्तार समर्थक म्हणून ओळखले जायचे. पण त्यांच्यात फाटले आणि पालोदकर यांनीच सत्तार यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत दंड थोपटण्याची घोषणा केली. तेव्हा मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पालोदकरांना शिवसेनेत प्रवेश देण्याबाबत बोललो होतो. उद्धव साहेबांनी देखील त्यांना मातोश्रीवर घेऊन या असे मला सांगतिले.

Chandrakant Khaire-Abdul Sattar
प्रत्येक आमदाराची ५० हजार कार्यकर्ते आणण्याची ताकद ; आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही..

मी तीन-चार दिवसांत पालोदकर यांना मातोश्रीवर घेऊन जाणारच होतो. पण त्याच दरम्यान, सत्तार याने कसा आणि कुठून लग्गा लावला कळालेच नाही. उद्धव साहेबांचा मला फोन आला आणि अब्दुल सत्तार यांना आपण शिवसेनेत प्रवेश देत असल्याचे त्यांनी मला सांगितले. पालोदकरांना शिवसेनेत प्रवेश द्यायचे निश्चित झालेले असतांना अचानक हा निर्णय बदलल्याने मलाही धक्का बसला. भाजपने सत्तारची डोकेदुखी नको म्हणून तेव्हा त्याला आमच्याकडे पाठवून दिले, असेही खैरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in