उद्धव ठाकरेंचे लाडके आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही शिंदेंचे बोट धरले...

नगरसेवक ते आमदार म्हणुन ज्ञानराज चौगुले यांना संधी मिळाली. सलग तिसऱ्यांदा ते या मतदारसंघातून निवडून आले. (Shivsena)
Shivsena Mla Dnyanraj Chaugule
Shivsena Mla Dnyanraj ChauguleSarkarnama

उमरगा : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा - लोहारा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले नॉट रिचेबल आहेत. (Osmanabad) मंगळवार (ता.२१) सकाळपासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. (Shivsena) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेलेल्या १९ मंत्री व आमदारांच्या यादीत ज्ञानराज चौघुले यांचे देखील नाव समोर येत आहे. चौघुले हे शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची जिल्ह्यात व मराठवाड्यात (Marathwada) आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या बंडात खरंच सहभागी होतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात सुरूवातीपासूनच शिवसेनेचे प्राबल्य आहे. माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर नगरसेवक ते आमदार म्हणुन ज्ञानराज चौगुले यांना संधी मिळाली.

सलग तिसऱ्यांदा ते या मतदारसंघातून निवडून आले. दुसऱ्या टर्मला निवडून आल्यानंतर उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात ते शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्यावेळी त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ती त्यांना मिळाली नाही. त्यामुळे कदाचित ते नाराज असतील व त्यामुळेच ते शिंदे यांच्यासोबत गेले असतील अशी देखील चर्चा आहे.

चौगुले निष्ठावंत शिवसैनिक असले तरी माजी खासदार प्रा. गायकवाड यांच्यामुळे ते राजकारणात यशस्वी झाले हे नाकारता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातील लाडका आमदार म्हणुन चौगुले यांची चर्चा असते. पण चौगुले यांचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. एका कार्यक्रमानिमित्त ते उमरग्यात आले होते.

Shivsena Mla Dnyanraj Chaugule
Raosaheb Danve : राज्याच्या राजकारणात नवीन काहीतरी घडणार..

आता मंत्री शिंदे नॉटरिचेबल असल्याने राज्यात राजकीय भूकंप होईल असा तर्क लावला जात आहे. चौगुलेही नॉटरिचेबल असल्याने चर्चेला उधान आले आहे. एकंदरीत राज्यात राजकिय भूकंप झाला तर आमदार चौगुले त्याचे साक्षीदार होतील का ? हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com