Shivsena : स्लीप बाॅय ते पाचवेळा आमदार अन् कॅबिनेट मंत्रीपद, तरी भुमरेंनी गद्दारी का केली ?

मंत्रीपदाचा किस्सा सांगतांना भुमरे यांनी स्वतः सांगितले होते की, मी राज्यमंत्री करा म्हटलो होतो, पण उद्धव साहेबांनी मला कॅबिनेट मंत्री केले. (Minister Sandipan Bhumre)
Shivsena : स्लीप बाॅय ते पाचवेळा आमदार अन् कॅबिनेट मंत्रीपद, तरी भुमरेंनी गद्दारी का केली ?
Cm Uddhav Thackeray-Minister Sandipan Bhumresarkarnama

औरंगाबाद : फाटके कपडे, पायात घालायला चप्पल नाही, शिक्षणही जेमतेम अशा अनेकांना शिवसेनेने आमदार, खासदार, मंत्री केले. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कुणाची जात विचारली नाही, की तो गरीब आहे की श्रीमंत हे पाहिले नाही. केवळ हिंदुत्व आणि शिवसेनेसाठी (Shivsena) काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांना लाल दिव्याच्या गाडीत बसवले. औरंगाबाद आणि मराठवाड्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते, कारण त्यांनी इथल्या जनतेवर विश्वास दाखवला आणि लोकांनी बाळासाहेंबावर. त्यामुळे उमेदवार कुणीही असो निशाणी धनुष्यबाण पाहून मतदान करणारे आजही लाखो मतदार जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आहेत.

पायी चालणारे कार्यकर्ते पुढे आमदार, खासदार, मंत्री झाले. त्यातीलच एक नाव म्हणजे पैठणचे आमदार आणि (Paithan) राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे. पैठणच्याच संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बाॅय म्हणून काम करणारे भुमरे भविष्यात त्याच कारखान्याचे चेअरमन होऊन त्या खुर्चीत बसतील असे स्वप्न देखील त्यांनी कधी पाहिले नव्हते, पण शिवसेनेमुळे ते शक्य झाले. (Marathwada) पाचोड ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला भुमरे यांचा राजकीय प्रवास पुढे सभापती, कारखान्याचे चेअरमन आणि मग पैठण मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी असा झाला.

एक-दोन नव्हे तर पाचवेळा पैठणच्या जनतेने त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला. राज्यात दोनवेळा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, जिल्ह्यातील खैरे, बागडे यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. तिसऱ्यांदा २०१९ मध्ये राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आले. मंत्रीपदासाठी रस्सीखेच असतांना मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी भुमरे यांच्या एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केले.

Cm Uddhav Thackeray-Minister Sandipan Bhumre
Osmanabad : ज्ञानराज चौगुलेच्या बंडाने धक्का, तर सावंताचा निर्णय अपेक्षितच..

या मंत्रीपदाचा किस्सा सांगतांना भुमरे यांनी स्वतः सांगितले होते की, मी राज्यमंत्री करा म्हटलो होतो, पण उद्धव साहेबांनी मला कॅबिनेट मंत्री केले. एवढेच काय पण भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती आणि आता विधानसभेची उमेदवारी असे नियोजन सुरू होते. अस सगळं काही सुरळीत सुरू असतांना ज्या उद्धव ठाकरेंनी भुमरेंना थेट कॅबिनेट मंत्री केले त्यांनीच एकनाथ शिंदेंच्या बंडात शामील व्हावे, याचे आश्चर्य वाटते. भुमरेंच्या या गद्दारीबद्दल जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. भुमरे साहेबांना शिवसेनेने काय कमी केले? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थीत केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in