Shivsena : अखेर दानवेंचा भार ठाकरेंनी कमी केलाच, तनवाणींची जिल्हाप्रमुख पदी निवड

शहरातील तीनही मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा जिल्हाप्रमुख पदाचा भार उद्धव ठाकरे यांनी निम्म्याने कमी केल्याचे दिसते. (Shivsena, Aurangabad)
Aurangabad Shivsena political News
Aurangabad Shivsena political NewsSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर असलेला भार अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कमी केला. नुकतीच औरंगाबादच्या महानगर प्रमुखपदी निवड झालेले किशनचंद तनवाणी यांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदार संघाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Aurangabad Shivsena political News
Milind Narvekar : वाढदिवस अमित शहांचा, चर्चा मिलिंद नार्वेकरांच्या टि्वटची !

आगामी महापालिका निवडणुक पाहता तनवाणी यांची निवड अत्यंत विचारपूर्वक करण्यात आल्याचे दिसते. (Shivsena) महिनाभरापुर्वीच राजेंद्र राठोड यांची ग्रामीण मधील सिल्लोड-सोयगाव, फुलंब्री आणि पैठण विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी तनवाणी यांच्यावर शहरातील तीनही मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा जिल्हाप्रमुख पदाचा भार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निम्म्याने कमी केल्याचे दिसते.

राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू अंबादास दानवे यांच्यावर सोपवली होती. राज्य प्रवक्ते, आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद अशी तिहेरी भूमिका जिल्हाप्रमुख असलेल्या अंबादास दानवे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून सांभाळली. परंतु राज्यातील अतिवृष्टीचे संकट, सततचा पाऊस, परतीच्या पावसाने उडालेली दाणादाण याशिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसह इतर मुद्द्यांवर अंबादास दानवे गेल्या महिन्याभरापासून राज्यभराचा दौरा करत आहेत.

Aurangabad Shivsena political News
`गेल्या तीन महिन्यात आम्ही चांगलेच पर्यटन केले आहे`

दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलने देखील झाली. दानवे यांची राज्य पातळीवर झालेली निवड आणि वाढलेला कामाचा व्याप पाहता जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व अधिकारांचे विकेंद्रीकरण करत उद्धव ठाकरे यांनी समतोल साधण्याचा देखील प्रयत्न केल्याचे दिसते. किशनचंद तनवाणी हे भाजपमध्ये जाऊन पुन्हा शिवसेनेत दाखल झाले होते. परंतु कोरोना आणि त्यामुळे लांबलेल्या महापालिकेच्या निवडणुका यामुळे तनवाणी यांच्यावर कुठलीच जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. तनवाणी समर्थक आणि स्वतः तनवाणी त्यामुळे नाराज होते

राज्यातील सत्तांतर, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि पदाशिवाय पक्षात असलेल्या मोठ्या स्थानिक नेत्यांना जबाबदारी वाटप करण्याचा वेग वाढला. त्यात तनवाणी यांना महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. जिल्हाप्रमुख पदाची अपेक्षा असताना महानगर प्रमुख पदावर बोळवण झाल्यामुळे तनवाणी काहीसे नाराज होते. एकीकडे तनवाणींची नाराजी तर दुसरीकडे दानवेंवर वाढलेला कामाचा व्याप यातून अखेर औरंगाबादलाही तीन जिल्हाप्रमुख देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पैकी अंबादास दानवे हे गेल्या पंधरा-वीस वर्षापासून जिल्हाप्रमुख पदी कार्य रत आहेत. खैरे समर्थक नरेंद्र त्रिवेदी यांना ग्रामीणच्या तीन मतदारसंघांचा पदभार देण्यात आला होता, परंतु दोन महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या रिक्त जागी शिवसेनेने राजेंद्र राठोड या ग्रामीण मधील उपजिल्हाप्रमुखाला संधी दिली. आता तनवाणी यांना शहरातील तीनही मतदार संघांची धुरा दिल्यामुळे तनवाणी यांची ताकद वाढली आहे.

एकीकडे शहरातील आंदोलनातून तनवाणी, खैरे यांना डावलले जात असल्याची चर्चा तर दुसरीकडे खैरे यांचे समर्थक तनवाणी यांच्यावर मोठी जबाबदारी देत ठाकरेंनी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला लगाम घातल्याचे दिसते. किशनचंद तनवाणी हे धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. महापालिकेत शहर प्रगती आघाडीचा प्रयोग असो की मग अपक्षांच्या मदतीने महापौर पद खेचून आणण्यात यश असो तनवाणी यांनी एखादा विषय हाती घेतला तर ती जबाबदारी फत्ते होणारच असा स्थानिक नेत्यांना विश्वास असतो.

औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काही वर्षांपूर्वी त्यांनी मिळवलेला विजय म्हणजे त्यांच्या चाणाक्ष राजकारणाचे उदाहरणच ठरले होते. दिवाणखान्यातील राजकारणात तरबेज असलेल्या तनवाणी यांच्यावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देऊ शकते. याशिवाय आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील तनवाणी यांची ही निवड महत्त्वाची समजली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com