Shivsena : मोर्चाला नॅनो म्हणणाऱ्या फडणवीसांची बुद्धीच नॅनो झाली आहे..

Ambadas Danve : तर राज्यपाल महोदय आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी
Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Ambadas Danve-Dcm Fadanvis News, AurangabadSarkarnama

Ambadas Danve : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून केली जाणारी महापुरुषांची बदनामी, सीमाप्रश्न व इतरांच्या विरोधात मुंबईत महाविकास आघाडीने हल्लाबोल मोर्चा काढला. Shivsena पण शिवसेना पक्ष जसा नॅनो होत चालला आहे, तसाच आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा देखील नॅनोच होता.

Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Samrudhi High Way : सात दिवसांत समृद्धीवरून धावली पन्नास हजार वाहने..

उद्धव ठाकरेंना हा मोर्चा विराट कुठून वाटतो, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला होता. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या मोर्चाला नॅनो म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची बुद्धीच नॅनो झाली आहे, अशी टीका दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी मिळून काढलेल्या मोर्चाला गर्दीच झाली नाही, मिडियाला द्रोण शाॅटच मिळाले नाही, अशा शब्दात फडणवीसांनी हल्लाबोल मोर्चाची आणि उद्धव ठाकरे यांनी त्याला संबोधलेल्या विराट मोर्चा या विशेषणाची खिल्ली उडवली होती.

त्याला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाविकासआघाडी मोर्चा हा नॅनो मोर्चा आहे असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांची बुद्धीच नॅनो झाली आहे.

मोर्च्याचे मोजमाप नीट लक्षात येत नसेल तर आपली, वाचाळ राज्यपाल महोदय आणि मंत्रिमंडळातील नॅनो बुद्धीच्या सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा टोला देखील दानवे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in