Shivsena : धमक्या द्यायला मुंबई, महाराष्ट्र राणेंना आंदण दिलायं का?

अशाप्रकारे गुंडगिरी व दादागिरी होत असेल तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve- Minister Narayan Rane News
Opposition Leader Ambadas Danve- Minister Narayan Rane NewsSarkarnama

मुंबई : केंद्रातील मंत्री नारायण राणे हे थेट दादागिरी करत धमकी देत आहेत. शिंदे फडणवीस यांचं सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असतील तर अशी दादागिरी करणारे सरकार बरखास्त करण्यात यावे, (Shivsena) ही आमची आणि सामान्य जनतेची मागणी असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांच्यांवर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. (Marathwada) अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं आहे ना ? (Narayan Rane) अशा धमक्या देत असतील तर राज्यातीलहे सरकार गुंडांचं सरकार आहे का? असा सवाल करत दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

मुंबई व महाराष्ट्र शिंदे भाजप यांना आंदण म्हणून दिल आहे का? गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, ते जर राज्यात कायदा व सुव्यस्था राखू शकत नसतील आणि अशाप्रकारे गुंडगिरी व दादागिरी होत असेल तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

Opposition Leader Ambadas Danve- Minister Narayan Rane News
व्हायरल ऑडिओ क्लीप उद्धव ठाकरेंच्या चमच्यांचीच, लवकरच उघड करू...

मुंबईत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा देखील झाला आहे. अशा सरवणकरांची भेट केंद्रीय अवजड उद्योगमंत्री राणे यांनी नुकतीच भेट घेतली होती. या भेटीच्यावेळी राणेंनी शिवसेनेला धमकी दिली होती. त्यानंतर अंबादास दानवे यांनी ही दादागिरी खपूवन घेतली जाणार नाही, असा इशारा देत सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com