Shivsena : पाणीपट्टी कपातीनंतर देसाई विमानतळ नामकरणाच्या मोहिमेवर..

राज्य सरकारने औरंगाबाद येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव घेऊन तो केंद्राकडे पाठवल्याची आठवण करून दिली. (Subhash Desai)
Dr. Karad-Desai- Shindiya
Dr. Karad-Desai- ShindiyaSarkarnama

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकणाऱ्या प्रश्नांवर शिवसेनेकडून सध्या तोडगा काढला जात आहे. भाजप, मनसेने पाणी प्रश्नावरून कोंडी करताच ती फोडण्यासाठी शिवसेनेने ५० टक्के पाणीपट्टी कपातीचा निर्णय घेतला. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी यात महत्वाची भूमिका बजावली. पाण्यामुळे औरंगाबादकरांमध्ये असलेली नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णायकडे पाहिले जाते. (Aurangabad) आता त्याच देसाईंवर औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करुन घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेच्या जिव्हाळ्याच्या विषय म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणे. परंतु राज्यात सत्ता आणि मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे असून देखील तीन पक्षांचे सरकार असल्याने संभाजीनगर होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. (Shivsena) मुंबईत झालेल्या सभेत संभाजीनगरच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून ते स्पष्ट देखील झाले आहे. त्यामुळे आता शहराचे नाही किमान विमानतळाला तरी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत.

चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असे नाव देण्याचा ठराव महाविकास आघाडी सरकराने संमत करुन तो केंद्राकडे पाठवलेला आहे. परंतु गेल्या वर्षभरात या ठरावावर निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई येथील ठाकरेंच्या सभेत संभाजीगरच्या मुद्यावर केलेल्या विधानावर भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा दाखला देत भाजपची सत्ता येईपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोलाच शिवसेनेला हिंदी भाषी महासंकल्प सभेतून लगावला होता.

त्यानंतर शिवसेनेने अचानक औरंगाबाद विमानतळाच्या नामकरणाचा विषय हाती घेत राज्याचे उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना दिल्लीला रवाना केले. तिथे मुळ औरंगाबादचे असलेले देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि सुभाष देसाई हे एकत्रितपणे नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची भेट घेतली.

Dr. Karad-Desai- Shindiya
Shivsena : मुंबईनंतर ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेकडे सगळ्यांचे लक्ष ; उद्या वर्षावर घेणार आढावा..

राज्य सरकारने औरंगाबाद येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव घेऊन तो केंद्राकडे पाठवल्याची आठवण करून दिली. या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन हे या नामकरणाला मंजुरी द्यावी, तसेच विमानतळासमोर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी या दोघांनीही केली.

याशिवाय विमानतळ विस्तारीकरणावर देखील या भेटीत चर्चा झाली. आता ज्योतिरादित्य सिंधिया विमानतळ नामकरणाला मंजुरी देतात ? की मग शिवसेनेला श्रेय मिळू नये म्हणून हा प्रश्न रखडवतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com