Shivsena : विधानसभेतला व्हिडिओ ट्विट करत दानवेंनी मुख्यमंत्र्यांना उघडे पाडले..

राज्यातील सत्तांतरानंतर दोन महिन्यातच वेदांता ग्रुपने गुजरातला पसंती दर्शवत आपला मोर्चा तिकडे वळवला. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde NewsSarkarnama

औरंगाबाद : वेदांता फाॅक्सकाॅनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. महाविकास आघाडीने पावणेदोन लाख कोटींची गुतंवणूक गुजरातला जाण्यास शिंदे-फडणवीस सरकार जबादार असल्याचा आरोप केला आहे. (Shivsena) तर नवे सरकार म्हणजे महाविकास आघाडीने वेळीच निर्णय घेतले नाही, म्हणून हा प्रकल्प गेला. यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पावसाळी अधिवेशनात त्यांनी सभागृहात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे राज्यात कसे मोठे उद्योग आणि गुंतवणूक येत आहे हे सांगत असतांना वेदांताचा उल्लेख करतांना दिसत आहे. (Maharashtra) वेदांतावाला आपल्याकडे ४ लाख कोटींची गुतंवणूक करत असल्याची माहिती शिंदे या व्हिडिओमध्ये सभागृहाला देतांना दिसत आहे. यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत `सांगा आता हे कोण बोलले होते.. ते पण सभागृहात` असे म्हणत टीका केली आहे.

वेदांता कंपनीने हा प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. पावणे दोन लाख कोटींची गुतवणूक आणि लाखो रोजगार मिळवून देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्वाचा होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पांच्या राज्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

परंतु राज्यातील सत्तांतरानंतर दोन महिन्यातच वेदांता ग्रुपने गुजरातला पसंती दर्शवत आपला मोर्चा तिकडे वळवला. त्यानंतर आघाडी सरकारमध्ये उद्योगमंत्री राहिलेले सुभाष देसाई, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली.

Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Latur : नुकसान जास्त, मदत कमी ; मुख्यमंत्री महोदय निर्णयाचा फेरविचार करा..

त्यानंतर भाजपकडून देखील प्रत्युत्तरा दाखल याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडण्यात आले. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतांनाच अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांचा सभागृहातील तो व्हिडिओ ट्विट करत शिंदे सरकारची गोची केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com