Shivsena : `एक काळी टोपीवाला` असा उल्लेख करत दानवेंची राज्यपालांवर शिवराळ टीका..

छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळाचे देखील आदर्श आहेत लक्षात ठेवा. मी जबाबदारीने बोलतोय गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली तरीही चालेल. (Ambadas Danve)
Bhgatsingh Koshyari-Ambadas Danve News, Aurangabad
Bhgatsingh Koshyari-Ambadas Danve News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. Governor राज्यपालांच्या विरोधात राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले असून त्यांना परत पाठवा अशी मागणी लावून धरली आहे. Maharashtra छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली आहे.

Bhgatsingh Koshyari-Ambadas Danve News, Aurangabad
Imtiaz Jalil : तर भाजपने यापुढे शिवाजी महाराजांचे फोटो, पुतळे आपल्या कार्यक्रमात ठेवू नयेत..

औरंगाबादेतील महाप्रबोधन यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी देखील राज्यपालांवर एक काळी टोपीवाला असा उल्लेख करत शिवराळ भाषेत टीका केली. (Bhagat Singh Koshayri) यावरून देखील आता राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांवर टीका करतांना हरा....र असा शब्द वापरल्यामुळे अंबादास दानवे अडचणीत आले आहे. (Shivsena) विशेष म्हणजे आपल्यावर गुन्हा दाखल झाला तरी हरकत नाही, असे म्हणत त्यांनी राज्यपालांबद्दल ही भाषा वापरली.

औरंगाबादेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेत दानवे यांनी भाषण केले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेतांना त्यांनी आक्रमक भाषण केले. राज्यपालांवर टीका करतांना दानवे म्हणाले, एक काळी टोपीवाला काल औरंगाबादेत आला होता. अरे हरा..र, मी बोलणाराच, काय गुन्हा दाखल करायचा माझ्यावर तो करा. छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळाचे देखील आदर्श आहेत लक्षात ठेवा.

मी जबाबदारीने बोलतोय गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली तरीही चालेल. आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिले होते असे विधान करणाऱ्या भाजपच्या राज्यसभा खासदार प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही दानवेंनी टीका केली.

अरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे भवानी तलवार होती. आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी तुझी जीभ एका मिनटात कापली असती, अशा शब्दात दानवेंनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com