सेना-ब्रिगेड युती : किती धूर निघावा तो.. दानवेंनी भातखळकरांना सुनावले..

भातखळकरजी, किती धूर निघावा तो. अहो ही युती महाराष्ट्राच्या मातीतील लेकरांशीच केली आहे, हे ध्यानी असू द्या! सत्तेत जाण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या लोकांशी युती करण्याची आमच्यावर अजून वेळ आली नाही` (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve-Mla Atul Bhatkahalkar News
Opposition Leader Ambadas Danve-Mla Atul Bhatkahalkar NewsSarkarnama

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात काल एक वेगळीच युती तयार झाली. शिंदेच्या बंडानंतर सैरभर झालेल्या (Shivsena) शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना हा निर्णय धक्कादायक आणि आश्चर्यकारक वाटला. तर (Bjp) भाजपने `विनाशकाले विपरित बुद्धी`, अशा शब्दात या युतीची खिल्ली उडवली. शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवरून आता भाजप विरुद्ध उद्धव सेना असा वाद रंगू लागला आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एक ट्विट करून या नव्या युतीची खिल्ली उडवली. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील भातखळकरांच्या टीकेला `किती तो धूर निघावा`, असा टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे. (Marathwada) शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीच्या राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होईल हे भविष्यात स्पष्ट होईलच, पण त्याआधीच भाजप आणि उद्धव सेनेत शब्दीक युध्द सुरू झाले आहे.

शिवसेनेचा हा नव घरोबा सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणार आहे, तर भाजपने आपल्या पारंपारिक मित्राला या नव्या निर्णयावरून चांगलेच चिमटे काढायला सुरूवात केली आहे. भाजपचे आमदार व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी काल एक खोचक ट्विट करत शिवसेनेला डिवचले होते.

`खोटा इतिहास सांगण्याचे आणि थापा मारण्याचे कौशल्य हा उद्धव ठाकरे आणि ब्रिगेड मधला समान धागा आहे. त्यामुळे ही नैसर्गिक युती आहे`, असा टोलो लगावणारे ट्विट भातखळकर यांनी केले होते. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर आले नाही तर नवलच. सध्या नव्यानेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झालेले अंबादास दानवे हे शिवसेनेचे राज्य प्रवक्ते देखील आहेत. त्यामुळे सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधकांशी दोन हात करण्याची दुहेरी भूमिका ते पार पाडत आहेत.

Opposition Leader Ambadas Danve-Mla Atul Bhatkahalkar News
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

भातखळकरांच्या ट्विटला दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर देणारे ट्विट केले आहे. `अहो, भातखळकरजी, किती धूर निघावा तो. अहो ही युती महाराष्ट्राच्या मातीतील लेकरांशीच केली आहे, हे ध्यानी असू द्या! सत्तेत जाण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या लोकांशी युती करण्याची आमच्यावर अजून वेळ आली नाही`, असा पलटवार दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या खास ठाकरे शैलीती ट्विटनंतर आता भातखळकर त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in