Shivsena : खैरे-बोरनारे यांच्यात जुंपली ; कपडे उतरवण्याची भाषा..

` बोरनारे भिकारी नाही, मी निवडणुक शपथ पत्रामध्ये १८ कोटींची संपत्ती दाखवली आहे, उलट तुमच्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मी खर्च केलेले ५० लाख कधी परत देणार. (Mla Ramesh Bornare)
Mla Ramesh Bornare-Chandrakant Khaire News Aurangabad
Mla Ramesh Bornare-Chandrakant Khaire News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड केले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. या बंडानंतर (Shivsena) शिवसेनेत उभी फूट पडली आणि महिनाभरापुर्वी एकमेकांच्या सोबत फिरणारे जिल्ह्यातील नेते आता एकमेकांचे वस्त्रहरण करतांना दिसत आहेत. शिंदेच्या बंडाला औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदरांनी बळ दिले आणि पक्षाला मोठा झटका बसला. पण या धक्यातून शिवसेनेला सावरण्याची जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, (Chandrakant Khiare) आमदार अंबादास दानवे यांनी स्वीकारली आहे.

बंडखोर आमदारांच्या शक्तीप्रदर्शनानंतर त्यांना जिल्ह्यात आणखी पाठिंबा मिळू नये यासाठी या दोन्ही नेत्यांनी जिल्हा पिंजून काढत बैठकांचा धडाका लावला. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद मोहिमेतून बंडखोरांना जोरदार दणका देण्यात शिवसेना आजघडीला यशस्वी ठरली आहे. बंडखोर विरुद्ध निष्ठावान या संघर्षात मात्र अनेक आतापर्यंत गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी उघड होऊ लागल्या आहेत. विशेषत: शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि वैजापूरचे बंडखोर आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या सध्या चांगलीच जुंपली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापुर्वी खैरे यांनी बोरनारे यांच्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकनाथ शिंदे यांनी दोन कोटी रुपये दिले होते, म्हणून ते शिंदेसोबत गेल्याचा गंभीर आरोप केला. यावर आतापर्यंत शांत असलेले बोरनारे चांगलेच संतापले आणि त्यांनी चंद्रकांत खैरे यांचे कपडे उतरवण्याची भाषा सुरू केली. खैरे यांचा एकेरी उल्लेख करत ` बोरनारे भिकारी नाही, मी निवडणुक शपथ पत्रामध्ये १८ कोटींची संपत्ती दाखवली आहे, उलट तुमच्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मी खर्च केलेले ५० लाख कधी परत देणार`, असा सवाल बोरनारे यांनी केला आहे.

Mla Ramesh Bornare-Chandrakant Khaire News Aurangabad
Shivsena : अजून काय हवे होते ? भुमरेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे कडाडले.

या आरोप-प्रत्यारोपामुळे २५-३० वर्ष सत्ता उपभोगलेल्या नेत्यांनी काय केले ? हे मात्र सामान्यांना देखील कळू लागले आहे. चंद्रकांत खैरेंनी माझ्या घरापर्यंत जाऊ नये, मी त्यांच्या घरापर्यंत गेलो तर त्यांना तोंड काढायला जागा उरणार नाही, लोक त्यांचे कपडे उतरवतील, असा इशारा बोरनारे यांनी दिला. आता खैरे-बोरनारे वाद आणखी किती टोकाला जातो आणि त्यातून काय नवीन माहिती बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in