Shivsena : बाळासाहेबांच नाव वापरून गद्दारांकडून पापांवर पांघरून घालण्याचे प्रयत्न..

एवढ हिंदूत्ववादाच बाळकडू मिळालेले असताना भाजपच्या नेत्याकडून हिंदूत्वाचे धडे घ्यावे लागत असेल तर हे दुर्देव असल्याचा टोला देखील दानवे यांनी शिंदे गटाच्या चाळीस गद्दार आमदारांना लगावला. (Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांच्या हिंदूत्व आणि विचारांचे धडे भाजप हे फुटीरवादी गदारांना देणार हे एकप्रकारे हास्यास्पद असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. शिवसेनाप्रमुखांच हिंदुत्व हे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणार आहे. देशात हिंदू म्हणून सन्मानाने जगायला, हिंदू म्हणून मतदान करायला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं.

Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad
Shivsena : सुषमा अंधारे करणार भुमरे, सत्तारांचे `प्रबोधन`, १८ - १९ ला मतदारसंघात घेणार सभा..

एवढ हिंदूत्ववादाच बाळकडू मिळालेले असताना भाजपच्या नेत्याकडून हिंदूत्वाचे धडे घ्यावे लागत असेल तर हे दुर्देव असल्याचा टोला देखील दानवे यांनी शिंदे गटाच्या चाळीस गद्दार आमदारांना लगावला. (Shivsena)

ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाशी गद्दारी केली, बाळासाहेब यांचे पुत्र उद्धवजी ठाकरे यांच्याशी प्रतारणा करत त्यांना सत्तेवरून खाली उतरवलं. एकप्रकारे हे गद्दार आमदार बाळासाहेबांना मनाने नव्हे तर शरीराने वंदन करणार आहेत.

बाळासाहेब यांचे नाव वापरून स्वतःच्या पापावर पांघरून घालण्याच काम हे ४० गद्दार आमदार करत असल्याची टिकाही दानवे यांनी केली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत गेलेले आमदार दर्शनासाठी येणार आहेत.

या पार्श्वभुमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आधी हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि मग बाळासाहेबांच्या दर्शनाला या, असा टोला लगावला होता. त्यानंतर आता अंबादास दानवे यांनी देखील शिंदे गटातील आमदारांना सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com