Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

Shivsena : खोक्यांची रक्कम वाढली ? गुवाहाटीत आमदारांना आणखी पाच कोटी ..

Chandrakant Khaire : शिंदे गटातील आमदार प्रचंड नाराज आहेत, ते केव्हाही फुटू शकतात.

Chandrakant Khaire News : `पन्नास खोके, एकदम ओक्के`, अशा जिव्हारी लागणाऱ्या घोषणांना शिंदे समर्थक आमदार आणि मंत्री वैतागले आहेत. Shivsena शिवसेना (उद्धव बाळासाहेब) या घोषणा देत नेहमीच शिंदे समर्थक आमदारांना डिवचत असतात. Aurangabad यावरून अनेक ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे गट एकमेकांना भिडल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. परंतु आता पन्नास खोकेंचा आकडा वाढला असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Shivsena : रस्त्यावर चारा जाळत शिवसेनेचा चक्काजाम ; पोलिसांनी घेतले ताब्यात..

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांचे समर्थक आमदार, मंत्री गुवाहाटीला कामाख्या देवीचे दर्शन घेवून आले. या दौऱ्यात शिंदे गटात फूट पडू नये म्हणून काही आमदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्यात आल्याची माहिता आपल्याला एका उद्योगपतीने दिली असल्याचा दावा खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. खैरेंच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे गटामध्ये भडका उडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या वतीने आज औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून केली जाणारी सक्तीची वीजबील वसुली आणि पीक विमा कंपन्यांच्या धोरणाविरुद्ध चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वैजापूर तालुक्यात शिऊर बंगला येथे खैरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम, रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना खैरेंनी गद्दार आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना गुवाहाटीत पुन्हा प्रत्येकी ५ कोटी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. खैरे म्हणाले, शिंदे गटातील आमदार प्रचंड नाराज आहेत, ते केव्हाही फुटू शकतात याची भिती मुख्यमंत्री शिंदेंना आहे. ते फुटू नयेत म्हणून काही आमदारांना गुवाहाटीत पुन्हा पाच पाच कोटी देण्यात आले आहेत.

एका उद्योगपतीने आपल्याला ही काल माहिती दिली. शेतकरी राज्यात आत्महत्या करू लागले आहेत, पण या बाबाचे त्याकडे लक्ष नाही, त्याचे सगळे लक्ष खोक्यांकडे आहे, असा टोला देखील खैरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com