Shivsena : आदित्य ठाकरेंच्या सभेने सत्तारांना मिरची झोंबली..

आदित्य ठाकरेंची सभा जाहीर झाल्यानंतर राज्यात वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गद्दार आणि मोठा खोका असलेल्या सत्तारांचा भांडाफोड आदित्य ठाकरे करणार आहेत. ( Opposition Leader Ambadas Danve)
Aditya Thackeray News, Aurangabad
Aditya Thackeray News, Aurangabad Sarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडमधील सभेची आम्ही घोषणा केली. त्यानंतर लगेच अब्दुल सत्तारांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या सभेचे नियोजन केले. याचाच अर्थ त्यांना ठाकरेंच्या सभेची मिरची झोंबली, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे.

Aditya Thackeray News, Aurangabad
Shivsena : 'मशालीचा' वाद अखेर शमला : समता पार्टीची याचिका फेटाळली!

आदित्य ठाकरे यांना छोटा पप्पू म्हणणारे सत्तार हे गद्दार आणि मोठे खोके घेणारे वाचाळवीर मंत्री आहेत, अशी टीकाही दानवे यांनी केली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोडमध्ये येवून शिवसंवाद यात्रा घेऊन दाखवा असे दिलेले आव्हान युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्वीकारले.

येत्या ७ नोव्हेंबर रोजी ते सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये मेळावा घेणार आहेत. अंबादास दानवे यांनी या संदर्भात नुकतीच माहिती दिली होती. ठाकरेंचा दौरा जाहिर होताच आव्हान देणाऱ्या सत्तारांनी त्याच दिवशी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे.

अंबादास दानवे म्हणाले, आदित्य ठाकरेंची सभा जाहीर झाल्यानंतर राज्यात वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गद्दार आणि मोठा कोका असलेल्या सत्तारांचा भांडाफोड आदित्य ठाकरे करणार आहेत. त्यामुळे सत्तार यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना चटका बसला आणि मिरच्याही झोंबल्या. म्हणून त्यांनी त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा त्याच दिवशी ठेवली.

सभा घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे त्यांनी सभा घ्यावी, आम्ही देखील ठरल्या प्रमाणे आदित्य ठाकरे यांची सभा घेणार आहोत. बुलडाण्याहून आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये येणार आहेत. तिथून औरंगाबादला बजाजनगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात ते परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in