'सामाजिक न्याय मंत्र्यांना दलित कुटूंबियांना मदतीसाठी वेळ मिळेना'

विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आहे.
Dhananjay Munde & Vinayak Mete
Dhananjay Munde & Vinayak MeteSarkarnama

बीड : गेवराई तालुक्यातील शहाजानपुर चकला येथील चार मुलांचा नदीपात्रात वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून झालेला मृत्यू हा जिल्हा प्रशासन व भ्रष्ट नेत्यांनी मिळून घेतलेला बळी असल्याचा घणाघात शिवसंग्रामचे (Shivsangram) अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केला. जिल्ह्याला सामाजिक न्यायमंत्री पद मिळाले आहे. मात्र, ज्या दलित कुटूंबातील अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्या परिवाराला मदत करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांना इतर कामातुन वेळ मिळत नाही, असा टोलाही मेटे यांनी नाव न घेता पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लगावला आहे.

Dhananjay Munde & Vinayak Mete
स्वकीयांनी केलेला घात विसरणार नाही; भविष्यात हिशेब करू : राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

सहा दिवसांपुर्वी गणेश बाबू इनकर, आकाश राम सोनवणे, बबलू गुणाजी वक्ते व अमोल संजय कोळेकर या चार शाळकरी मुलांचा नदीच्या पात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता.१३ फेब्रुवारी) आमदार मेटे यांनी या कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी या परिवारातील इतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्विकारली आहे. मेटे म्हणाले, वाळू माफियांवरच नव्हे तर महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनातील मोठ्या लॉबीवर कारवाई होण्याची गरज आहे.

Dhananjay Munde & Vinayak Mete
मोदींचा अहंकार उतरवण्यासाठी उत्तर भारतीय यूपीच्या नातेवाईकांना एक लाख पत्र पाठवणार

जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते महसूल व पोलिस प्रशासनातील लोकांचे स्वतःचे ट्रक ट्रॅक्टर व हायवा असल्याने वाळू माफिया सोबत वाळू उपसा धंद्यासाठी प्रशासनातील या लोकांकडून जोरदार मदत होते, असा आरोपही मेटेंनी केला. या चार अल्पवयीन मुलांचा बळी हा काही नेते व प्रशासनाने घेतला आहे. यासह जे गुन्हे नोंद केले आहे ते फक्त थातुरमातूर आहेत. घटना घडून सहा दिवस लोटले तरी सामाजिक न्याय मंत्र्यांनी किमान जिल्ह्यातील ही गंभीर घटना पाहून भेट देणे आवश्यक होते. परंतु त्यांना अजूनही वेळ मिळेना. दलित समाजातील ऊसतोड गोरगरीब बांधवांना अशा वेळी आधार देणे गरजेचे असताना. आतापर्यंत या ठिकाणी येऊन कुणीच आधार दिलेला नाही ही बाब लांछनादस्पद आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या परिवाराला भेट देऊन या कुटूंबाला प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणीही मेटे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com