औंढा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बिनविरोध

नगराध्यक्षपदी राजू ऊर्फ कपील विठ्ठल खंदारे व उपनगराध्यक्षपदी साहेबराव देशमुख (काळे) या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. (Shivsena Hingoli)
Shivsena, Aundha, Hingoli
Shivsena, Aundha, HingoliSarkarnama

औंढा नागनाथ : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे राजू ऊर्फ कपील विठ्ठल खंदारे तर उपनगराध्यक्षपदी सेनेचेच साहेबराव देशमुख (काळे) यांची बिनविरोध निवड झाली. (Shivsena) गुरुवारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. नगरपंचायतच्या १७ पैकी ९ जागा शिवसेना, काँग्रेस ४, तर भाजप व वंचित आघाडीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. (Hingoli) शिवसेनेने बहुमतासह सत्ता मिळवत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांसाठी मोर्चे बांधणी सुरु केली होती. (Marathwada)

८ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. त्या दिवशी शिवसेनेकडून राजु खंदारे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच बाकी होती. आज (ता.१७) रोजी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेला शिवसेनेसह इतर पक्षांचे सदस्य हजर होते.

सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून साहेबराव देशमुख (काळे ) यांचा एकमात्र अर्ज आला. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जयस्वाल यांनी नगराध्यक्षपदी राजू ऊर्फ कपील विठ्ठल खंदारे व उपनगराध्यक्षपदी साहेबराव देशमुख (काळे) या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

Shivsena, Aundha, Hingoli
पालकमंत्र्यांनी शब्द पाळला; औरंगाबाद जिल्ह्यासाठी पाचशे कोटींचा निधी मंजुर

विजयाच्या घोषणनेनंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची औंढा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार संतोष बांगर ,युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम ,समाजकल्याण सभापती फकीरा मुंडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com