Hingoli : काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षानेच घेतला शिवसेनेचा भगवा हाती ; समर्थकांसह पक्षप्रवेश..

खासदार राजीव सातव यांचे अत्यंत निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती, परंतु सातव यांच्या अकाली निधनाने तालुक्यात काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. (Hingoli)
Hingoli : काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षानेच घेतला शिवसेनेचा भगवा हाती ; समर्थकांसह पक्षप्रवेश..
Minister Eknath Shinde, MumbaiSarkarnama

हिंगोली : राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर पक्ष वाढवण्याच्या नावाखाली फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे. (Hingoli) राष्ट्रवादी-काॅंग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी एकमकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडत त्यांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. (Shivsena) यातून स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असली तरी कोणताच पक्ष थांबायला तयार नाही. (Congress) हिंगोलीत काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षानेच आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबईत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय पाटी बोंढारे व त्यांच्या समर्थकांनी हाती शिवबंधन बांधून घेतले. (Marathwada) त्यांच्या शिवसेना प्रवेशाने बाळापुरसह परिसरामध्ये काँग्रेसला खिंडार पडले असून या भागात आता शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आखाडा बाळापूर येथील संजय पाटील बोंढारे यांनी राजकारणात उतरून आपल्या कार्यकाळात उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ते जिल्हा परिषद शिक्षण सभापती असा प्रवास सुरू केला.

तसेच आखाडा बाळापुर शहरावर संजय पाटील बोंढारे यांचे वर्चस्व असून ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती असो की इतर सोसायटी यांच्यावर त्यांचा आजपर्यंत ताबा राहिलेला आहे. मूळचे शिवसेनेचे नेते असलेले संजय पाटील बोंढारे यांनी माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांच्या समवेत २००६ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी बाळापुर सर्कलमधून निवडून येत विजय मिळविला होता.

जिल्हा परिषदेवर काँग्रेसने सत्ता मिळवल्यानंतर शिक्षण व अर्थ सभापती हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांना मिळाले होते. शिक्षण सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील परिसरात वर्गखोल्या बांधत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले होते. त्यानंतर माजी खासदार शिवाजी माने यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. संजय पाटील यांनी मात्र माने यांच्यासोबत राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले होते.

Minister Eknath Shinde, Mumbai
Beed : आईचा दहावा झाला अन् लगेच आमदार क्षीरसागर सुरळीत पाण्यासाठी कामाला लागले

खासदार राजीव सातव यांचे अत्यंत निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती, परंतु सातव यांच्या अकाली निधनाने तालुक्यात काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. काँग्रेस पक्षात त्यांचे मन रमत नसल्याने व गटबाजीला कंटाळून अखेर त्यांनी मागेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु प्रदेशाध्यक्ष यांनी तो राजनामा न स्वीकारता वेट अँड वॉच असे सांगितले होते.

परंतु काँग्रेसमध्ये रमत नसल्याने शेवटी त्यांनी आपल्या समर्थकांसह शनिवार मुंबई येथे एकनाथ शिंदे व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान बोंढारे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.