शिवसेनेने दोन जागा जिंकल्या अन् १६ जागांवर डिपॉझिट गुल

अप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद मिळविण्यात बाजी मारली असली तरी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुरती बेअब्रु झाली. (Beed Shivsena)
Shivsena District Chief Appasaheb Jadhav
Shivsena District Chief Appasaheb JadhavSarkarnama

बीड : जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायकच ठरले. मात्र, शिवसेनेच्या तोंडाला तर अक्षरशः फेस आल्याचे निकालावरुन दिसले. (Beed) ८५ पैकी दोन जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) १६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. (Marathwada) विशेष म्हणजे ही सुमार कामगिरी पक्षाच्या जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या मतदार संघात आणि कार्यक्षेत्रात झाली आहे.

आष्टी, केज, वडवणी, पाटोदा व शिरुर कासार या पाच नगर पंचायतींच्या ८५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल बुधवारी लागले. यात आष्टी, शिरुर व पाटोदा या तीन नगर पंचायतींवर पुन्हा सत्ता राखण्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांना यश मिळाले. तर वडवणीत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना सत्तांतर करण्यात यश आले.

केजला मात्र काँग्रेसची दाणादाण उडाली. तीच गत राष्ट्रवादीचीही केजमध्ये झाली. पक्षाने पाच जागा जिंकल्या असल्या तरी जिल्हाध्यक्षांच्या कन्येला पराभवाचे तोंड पहावे लागले. पण, या निवडणुकीत शिवसेनेने केज, वडवणी व शिरुर कासार या तीन नगर पंचायतींच्या निवडणुक रिंगणात उडी मारली होती.

शिरुर कासार हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मतदार संघाला खेटून असलेला भाग आहे व त्यांची या भागाशी नाळ जोडलेली आहे. या ठिकाणी पक्षाचे दोन नगरसेवक विजयी देखील झाले. पण, केज व वडवणीत शिवसेनेची चांगलीच गाळण उडाली. मागील काही वर्षांपासून पक्षाला दोन जिल्हाप्रमुख आहेत.

सहा मतदार संघांपैकी परळी, माजलगाव आणि केज या तीन मतदार संघासाठी एक तर आष्टी, गेवराई व बीडसाठी एक अशी रचना झालेली आहे. माजलगाव, परळी व केजचा कार्यभार काही महिन्यांपूर्वी अप्पासाहेब जाधव यांच्याकडे आला.

Shivsena District Chief Appasaheb Jadhav
लातूरमध्ये महाविकास आघाडीला यश; काँग्रेसला सर्वाधिक जागा

पक्षातील जुन्या जाणत्या निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या अप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद मिळविण्यात बाजी मारली असली तरी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुरती बेअब्रु झाली.

त्यांच्या कार्यक्षेत्रातील व मतदार संघातील वडवणीत पक्षाला केवळ सहा उमेदवार उभा करता आले. त्यातही पाच जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.विशेष म्हणजे सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज १५५ आहे. तर, त्यांच्याच कार्यक्षेत्रातील केजमध्येही १३ उमेदवारांना केवळ २७८ मते मिळाली.

या ठिकाणी ११ उमेदवारांचे झिपॉझिट जप्त झाले आहे. निम्म्या भागासाठी पक्षाला अद्याप चार महिन्यांपासून जिल्हाप्रमुख देता आला नाही. तर, सध्या जिल्हाप्रमुख असलेल्या भागात पक्षाची अशी बिकट अवस्था आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com