शिवसेनेच्या महिलांनी साजरी केली स्मशान जोग्यांसोबत भाऊबीज

(Shivsena Fag Diwali Celebration)कोरोना काळात जिथे रक्ताने नातेवाईक दगावलेल्यांना हा लावायला तयार नव्हते तेव्हा स्माशन जोगी व त्यांच्या कुटुंबाने जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराचे मोठे कार्य पार पाडले.
Shivsena Celebrate Diwali
Shivsena Celebrate DiwaliSarkarnama

औरंगाबाद ः शिवसेनेच्या वतीने यंदा अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता शिवसेनेने भगवा ध्वज दिवाळी उपक्रमाअंतर्गत शहरातील ५० हजार घरांवर भगवे ध्वज लावण्याचा संकल्प केला होता. याशिवाय अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चक्क स्मशान भूमीत स्मशान जोगी व त्यांच्या कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या महिलांनी स्माशन भूमीत अंत्यसंस्काराचे अत्यंत महत्वाचे काम करणाऱ्या तरीही दुर्लक्षित असणाऱ्या स्मशान जोगींना भाऊबीजचे ओवाळले.

तसेच या कुटुंबाना मिठाई, कपडे व भेटवस्तु देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी आमदार अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेने भगवा ध्वज दिवाळी हा उपक्रम शहरात राबवण्यास सुरूवात केली आहे. समाजातील दुर्बल व दुर्लक्षित घटकांतील लोकांना देखील हा सण साजरा करता यावा, त्यांच्यांसोबत काही आनंदाचे क्षण घालवता यावेत, या हेतूने आज शिवसेना महिला आघाडीने पुढाकार घेत स्मशान जोगी व त्यांच्या कुटुंबियासोबत भाऊबीजेचा सण साजरा केला.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणाला अनुसरून शिवसेना सातत्याने काम करत असते. स्मशान जोगी व त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी, भाऊबीज साजरी करण्यामागे हाच हेतू होता. कारण हा अत्यंत महत्वाचा घटक असून देखील दुर्लक्षित आहे.

कोरोना काळात जिथे रक्ताने नातेवाईक दगावलेल्यांना हा लावायला तयार नव्हते तेव्हा स्माशन जोगी व त्यांच्या कुटुंबाने जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराचे मोठे कार्य पार पाडले. त्याने केलेले हे काम अंत्यत जोखमीचे होते, पण जीवावर उदार होऊन या कुटुंबांनी हजारो कोरोनाने मरण पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

Shivsena Celebrate Diwali
देवेंद्र फडणवीस हे तर बॅक बेंचर; मुंडे त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते!

त्यांच्या या कामाची जाणीव आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आदरातून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार या कुटुंबासोबत भाऊबीज साजरी केल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com