शिवसेनेचा बारामती अॅग्रोला इशारा ; कन्नडचा ऊस घेतल्याशिवाय एकही गाडी येऊ देणार नाही..

कारखान्याकडून गाळपासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात ऊस आणला जातो. पण तो आणत असतांना कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र वेटिंगवर ठेवले जाते. ( Shivsena Aurangabad)
Shivsena Mla Ambadas Danve
Shivsena Mla Ambadas DanveSarkarnama

औरंगाबाद : कन्नडचा सहकारी साखर कारखाना सध्या बारामती अॅंग्रोने चालवायला घेतला आहे. (Suger Factory) कन्नड व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून देखील इथे मोठ्या प्रमाणात ऊस येतो. परंतु ज्या तालुक्यात हा कारखाना आहे, त्या कन्नडला व्यवस्थापनाकडून दुर्लक्षित केले जात असल्याची भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. (Shivsena) त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी बारामती अॅंग्रोला इशारा दिला. (Aurangabad)

कारखाना कन्नडचा मग ऊस देखील आधी याच तालुक्यातील शेतकऱ्यांचा घेतला पाहिजे, अन्यथा बाहेरच्या तालुक्यातील एकही गाडी कारखान्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दानवे यांनी दिला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरात शिवसंवाद मोहिम राबवली जात आहे. कन्नड तालुक्यात संवाद साधतांना येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बारामती अॅंग्रोकडून ऊस नेण्याच्या बाबतीत होत असलेल्या त्रासाबद्दलची कैफियत मांडली.

गेल्या काही वर्षापासून कन्नड सहकारी साखर कारखाना हा बारामती अॅंग्रो कंपनीने चालवण्यासाठी घेतला आहे. कारखान्याकडून गाळपासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात ऊस आणला जातो. पण तो आणत असतांना कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र वेटिंगवर ठेवले जाते. घरचाच कारखाना पण ऊस टाकायचा म्हटंल तर त्यांना ताटकळत ठेवले जाते.

तर दुसरीकडे बाहेरच्या जिल्ह्यातील ऊसाचे ट्रक रिकामे होऊन जातात. हे कळाल्यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी बारामती अॅंग्रोच्या व्यवस्थापनाला इशारा दिला. कारखाना कन्नड तालुकावासियांचा आहे, तेव्हा आधी त्यांचा ऊस कारखान्याने घेतला पाहिजे. कन्नड तालुक्यात एकही ऊसाचे टिपरू शिल्लक राहता कामा नये.

Shivsena Mla Ambadas Danve
अमित देशमुखांनी केली कल्याण काळेंची पाठराखण

जर इथला ऊस शिल्लक असतांना बाहेरचा ऊस कारखान्याने घेतला तर एकही बाहेरची गाडी कारखान्यात येऊ देणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. लवकरच या संदर्भात आपण बारामती अॅंग्रोच्या व्यवस्थापनाशी बोलून हा प्रश्न मार्गी लावू, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com