पोलिस निरीक्षकांच्या विरोधात शिवसेना आमदार बसणार उपोषणाला

हिंगोली पोलिस दलातील काही अधिकारी हेतुपूरस्पर मला लक्ष्य करून मानसिक त्रास देत आहेत. अशा पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावे. (Mla Santosh Bangar)
Shivsena Mla Santosh Bangar
Shivsena Mla Santosh BangarSarkarnama

हिंगोली : विनाकारण घरी येऊन माझी नाहक बदनामी होईल या उद्देशाने वेळोवेळी चौकशी करणाऱ्या दोन पोलिस निरीक्षकांना निलंबित करा, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषणाला बसतो, असा इशारा कळमनुरीचे शिवेसना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी दिला आहे. (Shivsena)या संदर्भात बांगर यांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून संबंधितांना निलंबत केले नाही तर १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. (Hingoli)

आमदार बांगर यांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच एक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या विरोधात तक्रार देत काही आरोप केले आहेत. आज पंधरा जानेवारी रोजी कुठलीही पुर्व सूचना न देता हे दोन्ही पोलिस अधिकारी आपल्या घरी आले होते.

या शिवाय स्व. बाळासाहेब ठाकरे व्यायाम शाळेत येऊन बेकायेशीरपणे झडती करत चौकशीही केली. एवढेच नाही तर माझ्या कुटुंबातील सदस्यांशी अरेरावीची भाषा वापरत तुम्हा सर्वांना आत टाकीन अशी, धमकी देखील दिली. राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून कच्छवे आणि खंडेराय मला जाणीवपुर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shivsena Mla Santosh Bangar
साडेतेरा लाखांची बाईक विझवणार पिंपरीतील आग...

हिंगोली पोलिस दलातील काही अधिकारी हेतुपूरस्पर मला लक्ष्य करून मानसिक त्रास देत आहेत. अशा पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावे. अन्यथा १८ जानेवारी मंगळवार रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण सुरू करु. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल, असे देखील बांगर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com