राऊतसाहेब, आमच्याही मर्यादा आता संपल्यात! भूमरेंनी थेट आव्हानच दिलं

संदीपान भूमरे यांचा राऊतांवर पलटवार.
Shiv Sena MP Sanjay Raut
Shiv Sena MP Sanjay RautSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर आमदार संदीपान भूमरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मंत्री झाल्यानंतर भूमरे यांनी आपल्यासमोर लोटांगण घातल्याचा दावा राऊतांनी केला आहे. त्याला भूमरे यांनी प्रत्युत्तर देत लोटांगण घातल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले. तसेच आता आमच्याही मर्यादा संपल्या आहेत, असं सांगत त्यांनी राऊतांना सूचक इशारा दिला. (Sandipan Bhumre Latest News)

राऊतांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत भूमरेंवर टीका केली. ते म्हणाले होते की, संदीपान भूमरे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यालयात येऊन त्यांनी माझ्यासमोर प्रेमानं लोटांगण घातलं होतं. साहेब, तुम्ही होतात म्हणून सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो, असं त्यावेळी भूमरे म्हणाल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut
Shiv Sena : मंत्रिपद मिळाल्यानंतर भूमरेंनी राऊतांसमोर लोटांगण घातलं होतं!

त्यानंतर भूमरे यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांवर टीका केली. ते म्हणाले, मी मंत्री झाल्यानंतर त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी भेट घेतली होती. मी एक कार्यकर्ता आहे. 35 वर्षे शिवसेनेसाठी झटलो. मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतर फक्त आभार व्यक्त केले. लोटांगण घालण्याचा प्रश्नच येत नाही.

राऊतांच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ नका. रोज तेच-तेच बोलतात. लोकांनासुध्दा त्यांचं ऐकायचा कंटाळा आला आहे. राऊत टीव्हीसमोर आले की लोकं टीव्ही बंद करत आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. संजय राऊतांनीही आता शांत बसलं पाहिजे. टीका केली पाहिजे, पण कोणत्या पातळीवर केली पाहिजे, यालाही मर्यादा आहे. आमच्याही मर्यादा आता संपलेल्या आहेत, असा इशारा भूमरे यांनी दिला.

Shiv Sena MP Sanjay Raut
भावना गवळींची उचलबांगडी अन् विचारेंना बढती का? राऊतांनीच सांगितलं कारण...

पाटणमधून निवडणूक लढवली तर आनंदच

आम्हीही 3 ते 4 लाख मतांतून निवडून आलो आहे. आम्ही आयते निवडून आलो नाही. राऊतांनी राजीनामा देत जनमतातून निवडून येऊन दाखवावे. तरच आम्ही त्यांना मानू. जनमतातून कसं निवडून यावं लागतं, ते त्यांना कळेल, असं आव्हान भूमरे यांनी दिलं. पाटणमधून राऊत निवडणुकीसाठी उतरले तर काय कराल, या प्रश्नावर भूमरे यांनी आनंदच होईल, असं उत्तर दिलं. त्याचा निकाल काय लागेल, यावर मात्र भूमरे यांनी बोलायचं टाळलं. त्यांनी आधी येऊन तर दाखवावे, असं आव्हानच भूमरे यांनी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com