Beed : नवनीत राणांचे आव्हान शिवसेनेच्या मंत्र्याने स्वीकारले ; मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर अमरावतीतून लढणार..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात चांगले काम करत आहेत, देशात क्रमांक एकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या पुढे राणा दामप्त्यांची उंची काहीच नाही. (Abdul Sattar)
Beed : नवनीत राणांचे आव्हान शिवसेनेच्या मंत्र्याने स्वीकारले ; मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर अमरावतीतून लढणार..
Sattar- Rana-ThackeraySarkarnama

बीड : खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कुठल्याही मतदारसंघातून आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले होते. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर आपण अमरावतीतून नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात निवडणूक लढू असे सत्तार यांनी म्हटले आहे.

बीड येथे एका कार्यक्रमात बोलातांना सत्तार यांनी राणा दाम्पत्यांचा चारआणे असा उल्लेख करत त्यांना काहीच काम नसल्याने ते वायफळ बडबड करत असल्याचा टोला लगावला. (Uddhav Thackeray) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट राणा दाम्पत्याला चांगला महागात पडला होता. (Marathwada) महाविकास आघाडी सरकारने नवनीत व रवि राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.

बारा दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर बाहेर येताच नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेना विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या कुठल्याही मतदारसंघातून आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच नवनीत राणा यांनी दिले. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. परंतु राणा दाम्पत्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारल्याचे समजते.

Sattar- Rana-Thackeray
Osmanabad : उद्धवजी पीक विमा कंपन्यांना ठाकरी बाणा दाखवा..

पण नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे दिलेले आव्हान ठाकरे सरकारमधील शिवसेनेच्याच मंत्र्याने स्वीकारले आहे. महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हे आव्हान स्वीकारले असून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर आपण अमरावतीत जाऊन नवनीत राणा यांच्या विरोधात लढण्यास तयार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात चांगले काम करत आहेत, देशात क्रमांक एकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या पुढे राणा दामप्त्यांची उंची काहीच नाही. पण अशा चारआणे लोकांना दुसरे काही काम नसल्यानेच ते मुख्य्मंत्र्यावर टीका करत असल्याचे सत्तार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.