Chandrakant Khaire, Eknath Shinde
Chandrakant Khaire, Eknath Shindesarkarnama

'मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पुरुषांना पाचशे अन् महिलांना तीनशे रुपये!'

शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे यांचा आरोप

Chandrakant Khaire : औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या पैठण मतदारसंघात आज सभा घेत ठाकरे गटांवर जोरदार टीका केली. त्यावरुन शिवसेना (Shiv Sena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही हल्लाबोल केला. सभेला कोण बाहेरून लोक आणले, असा आरोप खैरे यांनी केला.

Chandrakant Khaire, Eknath Shinde
Aurangabad : दानवे म्हणाले, आमच्या पैठणचा बोक्या खोक्यांना विकला जाणारा नाही..

चंद्रकांत खैरे म्हणाले, शिंदेंच्या आजच्या भाषणात दम नव्हता. ते टेन्शन व प्रेशरमध्ये बोलताना दिसले. या सभेसाठी पैठण तालुक्यातील मोजकेच लोक होते. ही सभा पैठण तालुक्याची नव्हती, नगर, परभणी, जालना, येथील लोकच सभेमध्ये जास्त होते. संदीपानभुमरे हा डाकू माणूस आहे, असा घणाघत त्यांनी केला. त्यामुळे डाकूच्या सभेला पैठणचे लोक येणार नाहीत. याची त्यांनाही कल्पना होती म्हणूनच सभेला गर्दी जमवण्यासाठी महिलांना तीनशे रुपये आणि पुरुषांना पाचशे रुपये दिले, असा आरोप खैरे यांनी केला.

संदीपान भुमरे व शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने पैठणला सभा घेतली. या सभेत भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री होते. भाजपची एक स्टाईल आहे, त्यांची कमळाची निशाणी लपत नाही. सभेत तेच दिसले. मुख्यमंत्री शिंदेंची भाजप स्पॉन्सर सभा झाली, असा हल्लाहबोल त्यांनी केला.

Chandrakant Khaire, Eknath Shinde
भाजपचा डाव; आढळरावांचे काय होणार?

शिंदे म्हणतात की, आम्ही आदित्य ठाकरेंच्या सभेत राष्ट्रवादीचे लोक आणले. हे साफ चूक आहे, असेही ते म्हणाले. आमची सभा अर्धा तासच झाली, त्यात लोक उभे होते. त्यांना आम्ही पैसे दिले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या सभेत लोक खुर्चीवर होते, त्यांना पैसे देऊन बसवले होते, असा आरोप त्यांनी केला. रावसाहेब दानवे स्वःत चकवा आहेत. आज ते संदीपान भुमरेंना बोका म्हणाले. आम्ही पण भुमरेंना आजपासून बोकाच म्हणू, असे सांगत त्यांनी भुमरे यांना टोला लगावाल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com