Ambadas Danve : राज्यात हवा शिवसेनेचीच, दगड धोंडेही निवडून येतील !

Ambadas Danve : चिन्ह कोणाला मिळेल याची फारशी चिंता करू नका.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

जालना : शिवसेना विरुद्ध शिंदे सेना यांच्यातील राजकीय वाद आणि चिन्ह कोणाचे याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीचा दाखला देत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटाला (eknath Shinde) टोला लगावला होता. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला 'हू आर यू' असे विचारले आहे आधी त्याचे उत्तर द्या, असे सुनावले होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेची अशी काही हवा निर्माण केली आहे की उद्या निवडणुकीत दगड धोंडे ही उभे केले तर ते निवडून येतील, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. जालना येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दानवे यांनी शिवसैनिकांना चिन्हाची चिंता करू नका,असे आवाहनही केले.

काल (बुधवारी) जालना येथील एका कार्यक्रमात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना दानवे यांनी धनुष्यबाण चिन्हाविषयी चिंता बाळगू नका, असे आवाहनही केले. दानवे म्हणाले, "शिवसैनिक हा निधड्या छातीने संकटांना सामोरा जाणारा असतो. ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती, विविध कार्यकारी सोसायटी अशा अनेक निवडणुकांमध्ये चिन्ह कुठलेही असले तरीही शिवसेनेचा मतदार ते शोधून पॅनल विजयी करत आला आहे. त्यामुळे चिन्ह कोणाला मिळेल याची फारशी चिंता करू नका,"

Ambadas Danve
Eknath Shinde : शिंदेचं मुख्यमंत्रीपद धोक्यात ? : उल्हास बापट यांचा गौप्यस्फोट

"पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेची अशी काही हवा निर्माण केली आहे की उद्या दगड, धोंड्यांना जरी उमेदवारी दिली तरीही ते निवडून येतील. अनेक शिवसेनेचे पदाधिकारी हे दोन्ही बाजूला असल्याचे दिसते. अनेकदा असे दिसून आले की धनुष्यबाणाचे काय होते ? बघू मग ठरव अशी त्यांची भूमिका असते. परंतु माझे त्यांना हेच सांगणे आहे धनुष्यबाण कुणाला मिळेल याची फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. न्यायालयात सत्याचाच विजय होणार आहे, धनुष्यबाण कुठेही जाणार नाही याची खात्री बाळगा,असे दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com