Shivsena : मोदी सरकार आवळा देऊन कोहळा काढते ; तरी शेतकरी दोन हजार आले की गावभंर सांगतो..

शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन येण्याच्या अगोदर सोयाबीनचा भाव दहा हजार रुपयांच्या घरात असतो व जेव्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येते तेव्हा भाव चार हजार ते साडेचार हजारापर्यंत खाली आणला जातो. (Omraje Nimabalkar)
Shivsena : मोदी सरकार आवळा देऊन कोहळा काढते ; तरी शेतकरी दोन हजार आले की गावभंर सांगतो..
Mp Omraje Nimabalkar-Pm ModiSarkarnama

निलंगा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व त्यांच्या विचारातून निर्माण झालेल्या शिवसेनेने (Shivsena) सामाजिक बांधिलकी जोपासत काम करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आमदार, खासदार बनवले. सर्वसामान्यांचा विचार करून निर्णय घेणारा एकमेव पक्ष शिवसेना हाच असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार हे आवळा देऊन कोहळा काढणारे असल्याची टीकाही त्यांनी केली.

हलगरा येथील शाखा उद्घाटन व शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. ८ जून रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये जागर शिवसेनेचा यासाठी ओमराजे निंबाळकर हे लातूर (Latur) जिल्ह्यात आले होते. निलंगा तालुक्यातील हलगरा येथे त्यांची सभा झाली.

खासदार निंबाळकर म्हणाले, केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणारे सरकार आहे. शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन येण्याच्या अगोदर सोयाबीनचा भाव दहा हजार रुपयांच्या घरात असतो व जेव्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात होते तेव्हा तो भाव चार हजार ते साडेचार हजार रुपयापर्यंत खाली आणला जातो. याच वेळेस सोयाबीन पेंड व तेल आयात करण्याचे या सरकारला सुचते जेणेकरून कमीत कमी दोन एकरवाल्या शेतकऱ्यांना सुद्धा लाख रुपयांचा फटका सहज बसतो.

दुसरीकडे शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये टाकून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो व शेतकरीही मोदीचे दोन हजार आले म्हणून गावभर सांगत फिरतो. एकीकडे लाखो रुपयाचे नुकसान करणारे सरकार दोन हजारात खुश करते म्हणून आवळा देऊन कोहळा काढणारे हे सरकार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केली, मागच्या वर्षी नांगरणीसाठी काय भाव होता व आज काय आहे हे तपासून पहा.

Mp Omraje Nimabalkar-Pm Modi
Osmanabad : शिवसेनेची ताकद अफाट ; आपल्याला काॅंग्रेस-राष्ट्रवादीची गरज नाही..

गॅस देणारे अन् सबसिडी बंद करणारे हेच..

गॅस कनेक्शन देणारे हेच सरकार व सबसिडी बंद करणारे सुद्धा हेच सरकार आहे. देशाच्या आयात-निर्यातीच्या धोरणावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो यामुळे शेतकऱ्याचा माल येताच आयात केली जाते. भाव पडतात याला केंद्र सरकारच जबाबदार आहे म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वसामान्यांचे सरकार आणण्यासाठी शिवसैनिक शाखाप्रमुख विभागप्रमुखांनी सर्वसामान्याच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन ओमराजे यांनी उपस्थितांना केले.

सर्वसामान्य गोरगरिबांची कामे केल्यास सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा सत्तेत येईल, म्हणून शिवसैनिकाने आपले मोठे बॅनर छापून वाढदिवस करण्यापेक्षा एका गोरगरीब आजी किंवा आजोबाची पगार करून दिली तर ते गावभर सांगतील. ते हक्काचे मतदान तयार होईल. शिवसैनिकांनी सर्वसामान्याच्या कामाला महत्त्व दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in