शिवसेना-भाजप २०२४ च्या निवडणुकीत एकत्र येतील

या सरकारने दोन वर्षे पूर्ण केली तरी मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत उदासीन आहे.
asudhin owasi
asudhin owasi Sarkarnama

खुलताबाद : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार असून, आता विरोधात असलेले शिवसेना, भाजप २०२४ च्या निवडणुकीत एकत्र दिसतील, असा दावा एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी खुलताबाद येथील पत्रकार परिषदेत केला. या सरकारने दोन वर्षे पूर्ण केली तरी मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत उदासीन आहे. तसेच पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत कुणालाही देणेघेणे नसून याचा फटका सामान्य माणसाला बसत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Shiv Sena-BJP to unite in 2024 elections : Asaduddin Owaisi)

खुलताबाद येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विश्रामगृहामध्ये शनिवारी (ता. ३० ऑक्टोबर) एमआयएमची महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती ठरविण्यासाठी बैठक घेण्यात आले. या बैठकीनंतर ओवैसी पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, मुस्लिम समाजाचा नुसताच मतपेटीसाठी वापर केला जातो. मात्र, मुस्लिम समाजाचे नेतृत्व विकसितच होऊ दिले जात नाही. तसेच, महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्यन खान प्रकरणाबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, बडे बाप के बेटेबद्दल आपल्याला काही देणे घेणे नाही.

asudhin owasi
देगलूर पोटनिवडणुकीत ६५ टक्के मतदान : चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस-भाजपत ‘कॉँटे की टक्कर’

गेल्या १८ महिन्यांपासून लडाखचा भूप्रदेश चीनच्या ताब्यात असून याबाबत खासदारांचे शिष्टमंडळ नेऊन परिस्थिती दाखविण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करीत असल्याची माहिती ओवैसी यांनी दिली. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूक एमआयएम संपूर्ण ताकदीनिशी लढणार असून या निवडणुकीत मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

asudhin owasi
संतोष जगताप खून प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक; पाटसमधील एका व्यक्तीवरही संशय

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाबाबत आवाज उठविण्यासाठी राज्यभरातून एमआयएमचे कार्यकर्ते २७ नोव्हेंबरला चलो मुंबई अभियान राबवणार आहे. विशाल जनसभेद्वारे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील, धुळे, मालेगाव येथील आमदार, गफ्फार काद्री यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com