Aurangabad : धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती शिवसेना-भाजपने एकत्र फुगडी घालत साजरी केली..

सावे, बागडे आणि दानवे यांनी फुगडी घातली. दोन पक्षांमध्ये असलेला तणाव काहीकाळासाठी का होईना कमी झाल्याचे पाहून दोन्ही पक्षाच्या समर्थकांना निश्चितच समाधान वाटले असणार. (Shivsena-Bjp)
Bjp Mla Atul Save- Shivsena Mla Ambadas Danve
Bjp Mla Atul Save- Shivsena Mla Ambadas DanveSarkarnama

औरंगाबाद : गेली २५ वर्ष एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जिल्ह्यात सत्ता उपभोगली तेच शिवसेना-भाजप एकमेकांचे कट्टर शत्रु बनले आहेत. (Shivsea-Bjp) कुरघोडी आणि एकमेकांना शह देण्याची संधी दोन्ही बाजूने सोडली जात नाही. (Aurangbad) पण ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून हे दोन्ही पक्ष सध्या राजकारण करत आहेत, त्याच धर्मवीर संभाजी महाराजांनी या जुन्या मित्रांना काहीकाळ का होईना एकत्र आणले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित रॅलीमध्ये शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, भाजपचे हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांनी एकत्रित फुगडी घातली. सध्या शहरात पाणी प्रश्न गाजतो आहे. (Marathwada) शिवसेनेची या प्रश्नावरून कोंडी करण्यासाठी भाजपने रणनिती आखली असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे रोजी औरंगाबादेत मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. असे असतांना भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी हातात हात घेत घातलेली फुगडी अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली.

एमआएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबादला औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यावरून राज्यभरात वाद सुरू आहे. दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजप-मनसेने पाणी प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी चालवली आहे. भाजपने पाणी प्रश्नावर आंदोलन केल्यानंतर काल पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ५० टक्के पाणी पट्टी माफ करण्याची घोषणा केली. मुलबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत औरंगाबदकरांकडून आता अर्धीच पाणीपट्टी घेतली जाणार आहे.

Bjp Mla Atul Save- Shivsena Mla Ambadas Danve
"नवनीत राणा आधी बारमध्ये काम करत होत्या" : राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली

या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून देखील शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. असे असतांना टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवसेना-भाजपचे नेते, आमदार, खासदार एकत्र आले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड,आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते. यावेळी सावे, बागडे आणि दानवे यांनी फुगडी घातली. दोन पक्षांमध्ये असलेला तणाव काहीकाळासाठी का होईना कमी झाल्याचे पाहून दोन्ही पक्षाच्या समर्थकांना निश्चितच समाधान वाटले असणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com