Parbhani : शिवसैनिकांनी सत्तारांचा ताफा अडवला ; `पन्नास खोके`च्या घोषणाही दिल्या..

संधी मिळताच शिवसैनिकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना आपला रुद्रावतार दाखवल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. (Parbhani Shivsena)
Minister Abdul Sattar News, Parbhani
Minister Abdul Sattar News, ParbhaniSarkarnama

परभणी : शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना आज जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या रोषाला समोर जावे लागले. (Parbhani) परभणीतील हिंदू गर्व गर्जना संपर्क मोहिमे दरम्यान, शिवसैनिकांनी अब्दुल सत्तार यांच्या गाड्यांचा ताफा अचानक अडवला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनुदान वाटपाच्या यादीतून परभणी जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत जाब विचारला. नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना दिले.

शिवसैनिक अचानक सत्तारांच्या ताफ्यासमोर आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. पण सत्तारांनी आंदोलनकर्त्या (Shivsena) शिवसैनिकांना सामोरे जात त्यांचे निवेदन स्वीकारले. पण सत्तार यांना पाहून काही शिवसैनिक चांगलेच संतापले होते, सत्तार गाडीत बसत असतांना अनेकांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा देखील देण्यात आल्या.

शिवसैनिक आक्रमक होत असल्याचे पाहून सत्तार यांनी गाडीत बसून ताफा पुढे नेला. राज्यातील सत्तातंरानंतर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला जिल्हा म्हणून परभणीचा उल्लेख केला जातो. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, जालना जिल्ह्यातून शिंदेसेनेला चांगलीच रसद मिळाली. पण शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला परभणी जिल्हा मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांची एकजूट कायम ठेवली. आज संधी मिळताच शिवसैनिकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना आपला रुद्रावतार दाखवल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Minister Abdul Sattar News, Parbhani
Sawant : माझ्या बापाचा फोटो लावू नका म्हणता, मग तुम्ही शिवाजी महाराजांचे फोटो का लावता ?

सत्तार यांच्यासमोरच शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओके म्हणत केलेल्या घोषणांमुळे यापुढे शिंदे सेनेतील मंत्र्यांनी शिवसेनेच्या रोषाला तोंड द्यावे लागणार असे दिसते. शिवसेनेच्या दसऱ्या मेळावा शिवाजीपार्कवर घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याच तर हा परिणाम नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com