Beed News: 'छत्रपती संभाजीनगर' असे स्टेटस ठेवल्याने शिवसैनिकाच्या घरावर हल्ला

या हल्ल्याप्रकरणी तेरा जणांविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात तेरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama

Beed news : एकीकडे एआयएमआयएम चे खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबादच्या नामांतराविरोधात उपोषण करत आहेत. यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. असे असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र छत्रपती संभाजीनगर असे स्टेट्स ठेवल्यामुळे शिवसैनिकाच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे ही घटना समोर आली आहे.

या हल्ल्याप्रकरणी तेरा जणांविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात तेरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसाळा येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते रुपेश गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगर असे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले होते. हे स्टेटस ठेवल्यामुळे शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान काही गायकवाड यांच्या ओळखीच्या तेरा आणि अज्ञात 10 ते 15 लोकांनी हल्ला थेट हल्ला केला.

Chhatrapati Sambhajinagar
Kokan Politics : मोठी बातमी ! राष्ट्रवादीचा बडा नेता उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार

या जमावाने रुपेश गायकवाड यांच्या घरावर दगडफेक करत 'तू लय शिवभक्त झाला आहेस का? तू बाहेर ये तुला ठार मारतो, आम्ही पण निजामांच्या अवलादी आहोत', असे म्हणत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे जमावाने त्याच्या स्वयंपाक घरातील संसार उपयोगी साहित्याचीही तोडफोड केली. घराचेही मोठे नुकसान केलं आहे. यामुळे परिसरात सध्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी रुपेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये उमेर मोईन शेख, शहीद आक्रमखा पठाण, सय्यद अजीज अनिस, शेख अख्तर मोईन, मुखिद पाशा मणियार, नेहाल तांबोळी, सय्यद शाबाज, अरबाज उर्फ बबु अलवार शेख, सय्यद अजीज जुबेर, शेख साबीर गफार, नेहाल इनामदार, सलीम अली इनामदार आणि इतर आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.

दरम्यान, घरावर हल्ला करणाऱ्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन ग्रामपंचायत सदस्य असल्याच आरोप गायकवाड यांनी केला आहे. उमेर मोईन शेख, शहीद आक्रमखा पठाण अशी त्यांची नावं आहेत. या दोघांच्या पुढाकारानेच २५-३० लोकांनी आपल्या घरावर हल्ला करत आपल्याला आणि कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप रुपेश गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com