शिवसैनिकांची 'बीड ते माताेश्री' पायी निष्ठा यात्रा : उद्धव ठाकरेंना समर्थन!

Shivsena : बीड ते मुंबई अशी २१ दिवसांची ही पायी निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे.
शिवसैनिकांची 'बीड ते माताेश्री' पायी निष्ठा यात्रा : उद्धव ठाकरेंना समर्थन!

बीड : शिवसेनेतल्या बंडानंतर आणि राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेच्या कठीण काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी बीड जिल्ह्याचे माजी तालुकाप्रमुख उल्हास गिरमे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून (१५ सप्टेंबर २०२२) पायी निष्ठा यात्रा निघणार आहे. आज सकाळी ९ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बीड ते मुंबई अशी २१ दिवसांची ही पायी निष्ठा यात्रा निघाली आहे.

बीड शहरातून आज सकाळी म्हणजे १५ सप्टेंबर २०२२ रोजी निष्ठा यात्रा मुंबईकडे निघाली आहे. नायगाव मधील हनुमान टेकडी येथे पहिला मुक्काम तर दहावा मुक्काम पिंपळे जगताप चौक वांजेवाडी, पंधरावा मुक्काम खोपोली तालुक्यातील साजगाव, सोळावा मुक्काम खानापूर, सतरावा मुक्काम आजीवली, अठरावा मुक्काम खारगर नवी मुंबई, एकोणीसावा मुक्काम वाशी नवी मुंबई, विसावा मुक्काम चुनाभट्टी चेंबूर येथे असून ५ आॅक्टोबर २०२२ रोजी दादर शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यात निष्ठा यात्रा पोहोचेल. दसरा मेळाव्यात ही यात्रा विलिन होणार आहे.

शिवसैनिकांची 'बीड ते माताेश्री' पायी निष्ठा यात्रा : उद्धव ठाकरेंना समर्थन!
Sanjay Shirsat : नाराजीच्या बातम्या द्याल तर मानहानीचा दावा दाखल करणार..

या पायी निष्ठा यात्रेला जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान पिंगळे, हनुमान जगताप, आशिष मस्के, सुशील पिंगळे, जिल्हा संघटक नितीन धांडे भगवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही यात्रा मुंबईकडे रवाना होणार आहे. या दिंडीत माजी तालुकाप्रमुख उल्हास गिराम, माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब पिंगळे, विलास महाराज शिंदे, सुनील अनभुले, पंकज कुटे, गोरख सिंगण, सुनील गवते, प्रदीप काटुळे, बाळू वैद्य, नंदू जोगदंड, अक्षय काशीद आदींसह दीडशे शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

निष्ठा यात्रेत शिवरथाची व्यवस्था करण्यात आले आहे. यात्रेत सहभागी शिवसैनिकांना चहा, नाश्ता, जेवण, पाऊस आल्यास रेनकोट, मुक्कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी व्यवस्था, आरोग्याच्या देखरेखीसाठी उपचारासाठी, रुग्णवाहिका व तज्ज्ञ डॉक्टर असणार आहेत. सहभागी शिवसैनिकांचा विमाही उतरवण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in