रॅलीत शिरसाटांची मर्सिडीज धडकली, तर तिकडे शहाजी पाटलांच्या खोलीचे छत कोसळले..

समोरच्या आणि मागच्या अशा दोन्ही बाजुंनी मर्सिडीजचे बरेच नुकसान झाले. या प्रकारामुळे शिरसाट चांगलेच संतापले होते. (Mla Sanjay Shirsat)
Mla Sanjay Shirsat-Sahajibapu Patil
Mla Sanjay Shirsat-Sahajibapu PatilSarkarnama

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेले बंड त्यांच्या भाषेतील उठाव यशस्वी झाल्यानंतर आता सगळे आमदार हे आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. मतदारसंघात परतल्यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या राजकीय विरोधकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न ही काही जणांनी केला. यात औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आघाडीवर होते. शिंदेच्या बंडात सहभाग आणि सर्वाधिक चर्चेत असलेले दोन चेहरे म्हणजे आमदार शहाजीबापू पाटील (Maharashtra) आणि दुसरे संजय शिरसाट.

या दोघांच्या बाबतीत एक योगायोग घडला आहे, तो फार काही चांगले संकेत देणारा नव्हता पण हा योगायोग कसा? असा प्रश्न या निमित्ताने निश्चितच पडतो. संजय शिरसाट यांचे काल तब्बल २० दिवसांनी शहरात आगमन झाले. (Aurangabad) आपले कमबॅक एकदम झोकात झाले पाहिजे यासाठी शिरसाट यांनी जोरदार तयारी केली होती. अगदी विमानतळापासून ते संपर्क कार्यालयापर्यंत शंभरहून अधिक चारचाकी गाड्यांची रॅली यावेळी काढण्यात आली होती.

पांढऱ्या शुभ्र मर्सिडीजमध्ये संजय शिरसाट उभे होते, आणि समर्थकांना अभिवादन करत होते. एकापाठोपाठ एक अशा सिंघममधील जंयकांत शिकरे टाईप वाहनांचा ताफा उड्डाणपुलावरून सुसाट निघाला होता. एवढ्यात सेव्हनहिल उड्डाणपुलावर शिरसाट यांच्या समोर हा सगळा सोहळा आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या प्रसारमाध्यमांची गाडी होती. या गाडीच्या चालकाने अचानक करकचून ब्रेक मारला आणि शिरसाटांची सुसाट गाडी येऊन त्यावर धडकली.

नव्या कोऱ्या मर्सिडीजच्या समोरचा भाग बराच डॅमज झाला. बर शिरसाट यांच्या मागून देखील अनेक गाड्या येत होत्या. समोरच्या चालकाने ब्रेक दाबला म्हणून शिरसाट त्या गाडीवर धडकले तर मागची गाडी शिरसाटांच्या गाडीला धडकली. त्यामुळे समोरच्या आणि मागच्या अशा दोन्ही बाजुंनी मर्सिडीजचे बरेच नुकसान झाले. या प्रकारामुळे शिरसाट चांगलेच संतापले होते, त्यांनी समोरच्या आणि मागच्या दोन्ही गाडीच्या चालकांना फैलावर घेतले आणि मग हा ताफा पुढे मार्गस्थ झाला.

Mla Sanjay Shirsat-Sahajibapu Patil
Beed : पंकजा मुंडेंच्या मंत्रीपदासाठी महिलांची बीड ते मोहटादेवी पायी दिंडी

इकडे शिरसाटांची कार धडकली, तर दुसरीकडे `काय ती झाडी, काय तो डोंगार, काय ते हाॅटेल समद ओकेमध्ये हाय`, फेम शहाजीबापू पाटील देखील एका मोठ्या दुर्घटनेतून बालबाल बचावले. आकाशवाणी या आमदार निवासातील त्यांच्या खोलीच्या छताचा भलामोठा भाग खाली कोसळला.

विशेष म्हणजे शहाजीबापू तेव्हा आमदार निवासातील याच खोलीत पण दुसऱ्या रुममध्ये होते. त्यामुळे त्यांना काही दुखापत झाली नाही. ही घटना कळताच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी अनेकांनी फोन केले. शिंदे बंडातील हे दोन्ही आमदार सुखरुप आहेत, पण त्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटना कशाच्या संकेत देत आहेत, याची मात्र चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com