Shinde-Sawant : आम्ही तीन महिन्यापुर्वीच फटाके फोडले ; तुम्ही पळ काढलात..

आता या आतषबाजीनंतर दोन्ही बाजूंनी फटाके फुटल्याशिवाय राहणार नाहीत. ( Eknath Shinde)
Cm Eknath Shinde-Arvind Sawant News Mumbai
Cm Eknath Shinde-Arvind Sawant News MumbaiSarkarnama

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर उद्धवसेना आणि शिंदेसेनेत सुरू असलेला कलगितुरा अद्यापही सुरूच आहे. आता दिवाळीत तो अधिकच वाढल्याचे पहायला मिळाले. ठाण्यातील दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी `आम्ही तीन महिन्यापूर्वीच फटाके फोडले असून आमचा आवाज किती डेसिबल होता हे विरोधक अजूनही मोजत आहेत`, असा टोला लगावला. त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युतर दिले आहे.

Cm Eknath Shinde-Arvind Sawant News Mumbai
Satara : मुख्यमंत्री करतात १८ तास काम.. महाराष्ट्राला देशात नंबर एक बनविणार...

सावंत म्हणाले, भारतीय क्रिकेट संघाने मैदानात राहून सामना जिंकला, मॅच जिंकून देशाचा अभिमान वाढवला. तुम्ही पाठीत खंजीर खुपसला, गद्दारी केली. (Eknath Shinde) मैदानातून पळ काढलात. (Arvind Sawant) आता या आतषबाजीनंतर दोन्ही बाजूंनी फटाके फुटल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीची चर्चा सुरू आहे.

राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देवू लागले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यासह मुंबईतील विविध दिवाळी पहाट व इतर कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. या निमित्ताने जमलेल्या गर्दीसमोर भाषण करतांना मुख्यमंत्री उद्धवसेनेला चिमटा काढण्याची एकही संधी सोडत नाहीत.

नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला आणि देशात दिवाळी आधीच फटाके फोडण्यात आले. याचाच संदर्भ देत ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आम्ही तीन महिन्या आधीच फटाके फोडले, असा टोला लगावला.त्यावर उद्धवसेनेची बाजू सांभाळणारे खासदार अरविंद सांवत यांनीही जशास तसे उत्तर देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com