शिंदे म्हणाले तुला आमदार करण्यासाठी खूप केले, मी म्हणालो पक्षप्रमुखांनी सांगितले म्हणून केले..

अंबादास दानवे यांनी काल पदाधिकाऱ्यांची बैठक आपल्या संपर्क कार्यालयात घेतली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. (Mla Ambadas Danve)
Mla Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Aurangabad
Mla Ambadas Danve-Cm Eknath Shinde News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : बंडखोर आमदार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना आम्ही तुमच्यासाठी काय केले ? हे सांगून उपकाराची भाषा करत आहेत. पण त्यांचे ऐकून घेण्याची गरज नाही, त्यांच्या टीकेला उत्तर द्या, असे आवाहन (Shivsena) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले.

मलाही एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) फोन आला होता, ते म्हणाले तुला आमदार करण्यासाठी मी खूप काही केले. मी म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले म्हणून आणि शिवसेना म्हणून तुम्ही ते केले, अशा शब्दात दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापुर्वी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आक्रमक पावित्रा घेतला.

युवासेना अध्यक्ष आजपासून महाराष्ट्रात शिवसंवाद दौरा करत आहेत, औरंगाबादेत ते उद्या दाखल होतील. तत्तपुर्वी अंबादास दानवे यांनी काल पदाधिकाऱ्यांची बैठक आपल्या संपर्क कार्यालयात घेतली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले.

दानवे म्हणाले, बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांच्याशी उपकाराची भाषा वापरत आहेत. मी तुझ्यासाठी हे केले, ती मदत केली, अमूक काम केले असे सांगून दबाव आणत आहेत. पण या दबावाला बळी पडण्याची गरज नाही.

Mla Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Aurangabad
ठाकरे गटात चिंतेचे वातावरण; CM एकनाथ शिंदे खासदार गजानन किर्तीकरांच्या भेटीला

कुणी-कुणावर उपकार केलेले नाहीत. बंडखोरांना सांगा तुम्ही आमच्या जीवावर निवडून आला आहात. त्यामुळे आमच्यासाठी काही केले असेल तर ते शिवसेना म्हणून केले. मला देखील एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, मला म्हणाले तुला आमदार करण्यासाठी मी खूप काही केले.

मी देखील त्यांना उत्तर दिले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगतिले म्हणून तुम्ही केले, शिवसेना म्हणून केले. मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे, पक्षप्रमुख आणि शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही. प्रत्येकाने असं बोलण्याची हिमंत दाखवावी, असे आवाहनही दानवे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com