शिंदे म्हणाले, माझ्यासोबतचे सगळेच मुख्यमंत्री ; अन् नांदेडला लाल दिवा नसल्याचे स्पष्ट..

शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करताना अडचणी येत होत्या. मतदारसंघाला न्याय देता येत नव्हता. त्यामुळे बालाजी कल्याणकर हे देखील माझ्यासोबत होते. (Cm Eknath Shinde)
Cm Eknath Shinde in Nanded News
Cm Eknath Shinde in Nanded NewsSarkarnama

नांदेड : महाआघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होते. घटक पक्षाकडून अन्याय होत होता. त्यामुळेच आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन हा निर्णय घेतला. (Nanded) आमच्या क्रांतीची दखल फक्त महाराष्ट्र आणि देशानेच नव्हे तर जगाने घेतली आहे. मी फक्त एकटा मुख्यमंत्री नाही तर माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री आहेत. बालाजीला मी कधी सोडणार नाही, अशा शब्दात (Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड मधील मेळाव्यात आपली भूमिका मांडली.

नांदेडमधील तरोडा भागातील भक्ती लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध १९२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्‍घाटन करण्यात आले. (Marathwada) यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंद पाटील बोंढारकर, शहराध्यक्ष तुलजेश यादव यांच्यासह अनेकजण शिंदे गटात आल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख सर्वांनी काम चालू ठेवावे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करताना अडचणी येत होत्या. मतदारसंघाला न्याय देता येत नव्हता. त्यामुळे बालाजी कल्याणकर हे देखील माझ्यासोबत होते. त्यांना देखील सुरवातीला खूप चिंता होती. मात्र, मी त्याच्यासह सोबतच्या सर्वांनाच विश्वास दिला. शिवसेना वाचविण्याचे काम आपण सगळे करतोय, हे सगळ्यांना सांगितले. आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणायची असेल आणि अडचणी दूर करायच्या असतील तर क्रांती घडवावी लागेल, असा विश्वास दिला.

त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात कुठेही निधी कमी पडणार नाही. माझ्यासोबत आलेले सगळे पन्नास जण मुख्यमंत्रीच आहेत, असे स्पष्ट करत शिंदे यांनी सरकारमध्ये नांदेडला प्रतिनिधित्व मिळणार नसल्याचेही संकेत दिले. नांदेड महानगराच्या विस्तारामुळे उत्तर नांदेड अर्थात तरोडा, वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे नांदेडला विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.

Cm Eknath Shinde in Nanded News
जिल्हाप्रमुख, राज्य प्रवक्ते ते आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ; दानवेंचा चढता आलेख..

अर्ध्या तासाच्या अंतरावर पुर्णासारखे मोठे रेल्वे जंक्शन, वसमतसारखी मोठी कृषि बाजारपेठ व इतर कृषि क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या गावांचे अंतर लक्षात घेता पुर्णा, हिंगोली रस्ते विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे. या रस्ते विकासातून या भागातील वाहतुक सुलभतेसाठी मोठी सुविधा निर्माण होत असल्याचेही शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संजय राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विप्लव बाजोरिया, संध्याताई कल्याणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यकंट पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रविण पाटील चिखलीकर, चैतन्य देशमुख, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com