Maharashtra Politics : '8 ते 10 दिवसात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्के बसणार'

Maharashtra Politics : 'येत्या 8 ते 10 दिवसात शिवसेना रिकामी होणार'
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली. कारण शिवसेनेतील (ठाकरे गट) अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर अजूनही काही पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

तर येत्या 8 ते 10 दिवसात शिवसेना रिकामी होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्के बसणार तर नाहीत ना? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहीनीशी बोलताना हा दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

शिरसाट म्हणाले, ''येत्या 8 ते 10 दिवसात शिवसेना रिकामी होणार आहे. कारण शिवसेनेत उरलेले आमदारही 8 ते 10 दिवसात शिंदे गटात सामील होणार आहेत. शिवसेनेत सध्या जो सकाळचा भोंगा सुरू आहे त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) रिकामी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लढवयाच्या की नाही? हा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समोर असणार आहे'', असा दावा आमदार संजय शिरसाटांनी (Sanjay Shirsat) केलाय.

Uddhav Thackeray
Shivajirao Adhalarao Patil News : गेल्या सहा महिन्यांपासून बळ आले; २०२४ ला पुन्हा दंड थोपटणारच : आढळराव पाटील

''उद्धव ठाकरेंना मिसगाईड करणारे लोकं असल्यामुळे शिवसेना संपत आहे. आमचा उठाव झाला त्यावेळी मी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. मात्र आताही तेच सुरू आहे. सध्या कोण बोलतंय? त्यांनी ग्राऊंडलेव्हलवर उतरून काम केलंय का? कधी त्याबाबतची माहिती तरी घेतलीय का? ग्राऊंड लेव्हलची निवडणूक कशी लढतात? हे देखील त्यांना माहिती आहे का? सध्या शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरी देखील उद्धव ठाकरे गप्प का आहेत हे कळत नाही'', असं म्हणत शिरसाटांनी ठाकरे गटावर टीका केली.

Uddhav Thackeray
Sanjay Raut; तर मुख्यमंत्र्यांनी दारावर लाथ मारून राज्यपालांना जाब विचारला असता!

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर सध्या शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. तर आता शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) उरलेले आमदार देखील शिंदे गटात येणार असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून यावर ठाकरे गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com