Sharad Pawar : यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक कायम माझ्या अंत:करणात..

सुप्रीम कोर्टाचा बंडखोर आमदारांना निलंबित करण्यासंदर्भातला निकाल आला. या संदर्भात पवारांना विचारले असता मी निकाल वाचलेला नसल्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, असे सांगितले. (Sharad Pawar)
Sharad Pawar- Let. Yaswantrao Chavan-Vasantrao Naik News
Sharad Pawar- Let. Yaswantrao Chavan-Vasantrao Naik NewsSarkarnama

औरंगाबाद : माझ्या अंतकरणात ज्या लोकांचे मी कायम स्मरण करतो त्यापैकी यशवंतराव चव्हाण व वंसतराव नाईक हे आहेत. वंसतराव नाईक यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करतो, ते मुख्यमंत्री असतांना मला यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या शेतीक्षेत्रात त्यांनी अमूलाग्र बदल केले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कै. वसंतराव नाईक महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आणि वंसतराव नाईक यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख उपस्थिती होती. (Aurangabad) यावेळी बोलतांना शरद पवार यांनी वंसतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य केले. (Marathwada)

शरद पवार म्हणाले, माझ्या अंतकरणात कायम ज्या लोकांचे स्मरण मी करत असतो, त्यात यशवंतराव चव्हाण व वंसतराव नाईक यांचे नाव आहे. वंसतराव नाईक यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान होते. विशेषतः ते राज्याचे मुख्यमंत्री असतांना शेतीक्षेत्रामध्ये त्यांनी केलेले अमुलाग्र बदल कधीच विसरता येणार नाहीत. नाईक यांनी कायम तरुणांना संधी दिल्याचा उल्लेखही पवारांनी आवर्जून केला.

Sharad Pawar- Let. Yaswantrao Chavan-Vasantrao Naik News
Abdul sattar : मंत्रीपदाबाबत सत्तारांचे सूर मवाळ, शिंदेनी निधी देऊन बोळवण केली ?

शरद पवार हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. राज्यातील तसेच केंद्रातील राजकीय घडामोडींवर देखील काल त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. वंसतराव नाईक महाविद्यालयातील कार्यक्रम सुरू असतांनाच आज सुप्रीम कोर्टाचा बंडखोर आमदारांना निलंबित करण्यासंदर्भातला निकाल आला. या संदर्भात शरद पवार यांना विचारले असता मी निकाल वाचलेला नसल्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com