Bharat Jodo यात्रेत शरद पवार सहभागी होणार; कॉंग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं

Bharat Jodo Yatra |Sharad Pawar| भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेडमध्ये दाखल होत आहे.
Bharat Jodo Yatra |Sharad Pawar|
Bharat Jodo Yatra |Sharad Pawar|

Bharat Jodo Yatra | नांदेड : काँग्रेस पक्षाची खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेडमध्ये दाखल होत आहे. नांदेडच्या देगलूरहून महाराष्ट्रात कॉंग्रेसची ही भारत जोडो यात्रा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या ९ नोव्हेंबरला नांदेडमधील नायगावमधून या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. या यात्रेत शरद पवार यांच्यासह माजी मंत्री जयंत पाटील हेदेखील सहभागी होणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

या यात्रेसंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रोहित पवार यांनाही या यात्रेचे निमंत्रण देण्यात आले आहे. तेही यात सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेस (Congress) नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) चालण्याचा सराव करत आहेत. सतेज पाटील, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांचीही तयारी जोरदार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच व्यायाम करत असतात, त्यामुळे त्यांची पण तयारी जोमात सुरु आहे

Bharat Jodo Yatra |Sharad Pawar|
पुण्यासाठी राज ठाकरेंची नवी रणनिती; तब्बल साडेतीन हजार ‘राजदूत’ !

नॅशनल फुटबॉल खेळाडू असलेले विश्वजित कदम नेहमीच जॉगिंग करतात. भारत जोडो यात्रेसाठी कदम हे सहा किमी जॉगिंग दररोज करत आहेत. त्यामुळे संघटना पातळीवर यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरु असली तरी वयक्तीक पातळीवरही नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंतची ही भारत जोडो यात्रा असणार आहे. ७ नोव्हेंबरला सायंकाळी तेलंगणाच्या सीमेवरून देगलूर मार्गे महाराष्ट्रात यात्रा दाखल होणार आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेला सर्वच राज्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सर्वसामान्यांमध्ये यात्रेबद्दल प्रचंड उत्सूकता, आकर्षण आहे. केवळ काँग्रेसचीचीच ही यात्रा नाही, तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना व सर्वसामान्यांचा देखील या यात्रेत सहभाग असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com