Sharad Pawar : महागाईने आठ वर्षातील उच्चांक गाठलाय, त्याकडे लक्ष द्या..

२५ वर्षापूर्वीचे प्रकरण काढणे, माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरूद्ध तक्रार केलेल्या अधिकऱ्याला राज्याबाहेर आधार घ्यावा लागतो, याचा अर्थ काय काढायचा. (Sharad Pawar)
Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad PawarSarkarnama

नांदेड : इंधन दरात तसेच खाद्यतेलाच्या वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई दराने गेल्या आठ वर्षातील उच्चांक गाठला आहे. (Nanded) महागाई आवाक्याबाहेर जात असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. याबाबत डाव्या आघाडीतर्फे चर्चेसाठी माझ्याकडे विचारणा झाली असून (Inflation)महागाईबाबत सर्वांनी एकत्र येऊन भूमिका केंद्रात घेऊ, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (ता. १४) नांदेडला पत्रकार परिषदेत दिली.

नांदेडला पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने दुपारी साडेचार वाजता शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Marathwada) महागाई, राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न, भाजपकडून सरकार कोसळणार अशा वारंवार केल्या जाणाऱ्या वल्गना अशा सगळ्या विषयांवर पवारांनी आपले मत व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले, इंधन, गॅस सिलेंडर, खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने महागाई वाढली असून ती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची आहे. त्यामुळे याबाबत सीपीएमचे नेते येचुरी तसेच इतरांकडूनही विचारणा झाली असून महागाईबाबत सर्वांनी एकत्र येऊन केंद्रात भूमिका घेण्याचे ठरले आहे.

औरंगाबादला एमआयएमचे आमदार अकबरुद्दीने ओवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहत दर्शन घेतले. या संदर्भात प्रश्न विचारला असता महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे आणि औरंगजेब यांनी काय केले हे माहिती आहे. त्यामुळे कारण नसताना दुसऱ्या राज्यातून येऊन शांततेत असलेल्या महाराष्ट्रात नवीन प्रश्न निर्माण करणे योग्य नसल्याचे सांगत आपण अशा गोष्टीचा निषेधच करतो असे पवारांनी स्पष्ट केले.

राणे, पाटलांचे विधान एन्जाॅय करतो..

आघाडी सरकारवर आणि माझ्यावर आरोप करण्यात येत असले तरी सरकारला काहीही अडचण नाही. मी समाधानी असून आघाडी सरकार पाच वर्षे चालायला काहीच हरकत नाही. ही आणि पुढची पाच वर्ष देखील आम्ही सत्तेवर राहू, असा दावा करत पवारांनी नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील हे सातत्याने सरकारला तारखा देत असतात. पण त्यात काही तथ्य नाही, त्यांची विधाने आता ऍन्जाय करतो, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला.

यंदाच्या वर्षी अतिरिक्त ऊस झाला आहे. अतिरिक्त ऊसामुळे झालेली शेतकऱ्याची आत्महत्या चिंताजनक आहे. जालना, बीड, सातारा आदी जिल्ह्यात अतिरिक्त ऊस आहे. त्या संदर्भात कारखान्यांना सूचना दिल्या असून ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद करू नका, असेही राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणुक होत असून छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार आहेत. त्यावर महाविकास आघाडीची भूमिका काय असणार? यावर पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे संख्याबळ लक्षात घेता आमचा एक प्रतिनिधी निवडून येतो. शिल्लक १२ मते आहेत. शिवसेनेचाही एक निवडून येतो, त्यांचीही शिल्लक मते आहे. कॉँग्रेसही मदत करेल त्यामुळे काही अडचण येणार नाही. आम्ही सकारात्मक आहोत.

Ncp Leader Sharad Pawar
Imtiaz Jalil : घाणेरडे राजकारण करणाऱ्यांनो ओवेसींसारखी गरीबांसाठी शाळा उभारून दाखवा..

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणा संदर्भात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ओबीसी जागेच्या निकालाबाबत न्यायालयाचा निर्णय आणि निवडणुक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या एकत्र लढायच्या की स्वतंत्र लढवून पुन्हा एकत्र यायचे ? आदीबाबत त्या त्या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील असे पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते..

केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि राज्यातील पक्षाची भूमिका आम्हाला योग्य वाटत नाही. मतभेद असतात पण एकमेकांसंबंधीची टोकाची भूमिका, भावना ठेवणे योग्य नाही. एका चौकटीच्या बाहेर व्यक्तीगत स्वरूप येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यापूर्वी महाराष्ट्रात कधी असे घडले नाही. नवाब मलिक प्रवक्ते होते. २५ वर्षापूर्वीचे प्रकरण काढणे, माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरूद्ध तक्रार केलेल्या अधिकऱ्याला राज्याबाहेर आधार घ्यावा लागतो, याचा अर्थ काय काढायचा.

शेजारच्या श्रीलंका किंवा पाकिस्तानात घडणाऱ्या घडामोंडीवर विचारले असता पवार यांनी भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळे आपल्याकडे अशी परिस्थिती येणार नाही. नागरिकांच्या मुलभुत प्रश्नांची सोडवणुक होत नसेल तर त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार फौजिया खान, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com