'संभाजीराजेंनी ती ऑफर स्वीकारली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती...'

शरद पवारांनी संभाजीराजेंच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला होता : धनंजय मुंडे
Uddhav Thackeray-Sambhaji Raje-Dhananjay Munde
Uddhav Thackeray-Sambhaji Raje-Dhananjay MundeSarkarnama

परभणी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप संभाजी राजे (Sambhaji Raje) छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की, या विषयावर आम्ही जाणं बरोबर नाही. हा विषय शिवसेना (shivsena)आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामधील आहे. शिवसेनेने त्यांना बोलावलं आणि एक ऑफर दिली. त्या ऑफरबद्दल संभाजी राजे यांनी होकार दिला असता तर कदाचित आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असे विधान मुंडे यांनी केले आहे. (Sharad Pawar had decided to stand behind Sambhaji Raje: Dhananjay Munde)

परभणीतील कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान उपस्थित होत्या. मुंडे म्हणाले की, संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून आता माघार घेतली आहे. त्यांनी माघार का घेतली आहे, त्यात काय अडचणी आहेत, हे तेच स्वतःच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, असं म्हणत मुंडे यांनी संभाजीराजे यांच्याबाबत जास्त भाष्य करणं टाळलं.

Uddhav Thackeray-Sambhaji Raje-Dhananjay Munde
आम्ही युतीसोबत होतो; म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला : जानकरांचे फडणवीसांना उत्तर

संभाजी राजे छत्रपती यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा संभाजी राजे छत्रपती यांच्या पाठीमागे उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यानंतर पुढे काय राजकारण झालं, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्हा सर्वांच्याच मनात संभाजी राजे यांच्याविषयी आदर आहे. पण, हा आदर सर्वांत आधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला होता, असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray-Sambhaji Raje-Dhananjay Munde
केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतोय. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप संभाजी राजे यांनी सकाळी पत्रकार परिषदेत केला होता, त्याबाबत मुंडे म्हणाले की, या विषयावर आम्ही जाणं बरोबर नाही. हा विषय शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामधील आहे. शिवसेनेने त्यांना बोलावलं आणि एक ऑफर दिली. त्या ऑफरबद्दल संभाजी राजे यांनी होकार दिला असता तर कदाचित अशी सर्व परिस्थिती निर्माण झाली नसती. पण, एक निश्चित आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शरद पवार यांनी सर्वांत आधी भूमिका घेऊन, कोणीही समोर यायला तयार नव्हतं, त्यावेळी पवारसाहेब पुढे आले आणि संभाजीराजे छत्रपती यांना आमची जी अतिरिक्त मतं आहेत, ती द्यायला तयार आहोत, असे स्पष्टपणे सांगितले होते, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com