Sharad Pawar : प्रबोधनकार वाचले तरी ‘ते’असे प्रश्न विचारणार नाहीत..

डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना दिली, देशाला दृष्टी, विचार दिले. त्यांनी घेतलेले धरणांचे आणि विजेचे निर्णय आजही देशाला तारतात. (Sharad Pawar)
Sharad Pawar-Raj Thackeray
Sharad Pawar-Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : `परवा कुणीतरी एका नेत्यानी मुंबईत भाषण दिले. भाषणात सांगितले कि, शरद पवार हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेतात. माझी विनंती आहे त्यांना, महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. (Ncp) प्रबोधनकार ठाकरे हे एक विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले. प्रबोधकारांनी सामाजिक परिवर्तन यासंबंधी उत्तम लिखान केले आहे. (Sharad Pawar)आणि ते जर वाचले तर, यापुढे अशाप्रकारचे प्रश्‍न कुणी विचारणार नाही`, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता लगावला.

मुप्टा संघटनेचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन मंगळवारी (ता. २६) औरंगाबादेत झाले, त्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. (Marathwada) यावेळी शरद पवारांनी राज्यातील सध्याच्या परिस्थीतीवर भाष्य करतांना राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पवार म्हणाले, समाजाच्या उपेक्षित वर्गासाठी मुप्टा काम करते. त्यामुळे उपेक्षितांच्या मुलभूत प्रश्‍नांकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. तसेच, तुम्ही मांडलेले शिक्षण क्षेत्रातील प्रश्‍न उपमुख्यमंत्री सोडवतील, अशी अपेक्षा आहे. शिवरायांनी उभे केलेले राज्य भोसल्यांचे नव्हते तर उपेक्षितांचे आणि रयतेचे होते. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले.

Sharad Pawar-Raj Thackeray
Aurangabad : राज ठाकरेंनी नाकारले, भाजपने स्वीकारले..

शेती, सामाजिक समता त्यांनी मांडली. आधुनिकता हे त्यांचे वैशिष्ट्ये होते. ते कधी खुळचट कल्पनांच्या मागे कधी गेले नाहीत. शाहु राजांना खोट्या गोष्टीचा कधी त्यांनी पुरस्कार केला नाही. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना दिली, देशाला दृष्टी, विचार दिले. त्यांनी घेतलेले धरणांचे आणि विजेचे निर्णय आजही देशाला तारतात, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar-Raj Thackeray
Sharad Pawar : बजेटपेक्षा मागण्याच जास्त होतात, म्हणून मी शिक्षण मंत्रीपद सोडलं होतं..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com