भाजपच्या बड्या नेत्याकडून निवृत्तीची घोषणा; आता मला...

Aurangabad Politics| या घोषणेनंतर इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत
भाजपच्या बड्या नेत्याकडून निवृत्तीची घोषणा; आता मला...

Aurangabad News औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत सहा वेळ विजय मिळवला आहे. विधानसभा अध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. परंतु आता मात्र बागडे नानांनी स्वतःहूनच विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी फुलंब्री येथे आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात बोलताना बागडे यांनी याबाबत घोषणा केली. 'सालडयाचे माझे दीड वर्ष शिल्लक राहिले आहेत, त्यानंतर मला सालगडी म्हणून राहायचे नाही,' असे म्हणत हरीभाऊ बागडे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. हे माझे मत असून, पक्षाचे मत नाही. त्यामुळे पक्षाकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे मी पुढे काम करेल.

आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जरी न लढण्याचा मी निर्णय घेतला असला तरी सक्रीय राजकारणातून मी बाजूला जाणार नाही. ज्यांनी माझ्यासाठी कामे केली आहेत, त्यांच्यासाठी मला काम करायची आहे. त्यामुळे यापुढे मतदारसंघातील कार्यकर्ते, नागरिक यांच्यासाठी काम करणार, असल्याचं बागडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हरीभाऊ बागडे यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतल्यानंतर इच्छुकांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. पण बागडे यांच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे कठीण होते. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकांमध्येही बागडे यांचे वय पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. पण भाजपने बागडे यांनाच उमेदवारी दिली होती. पण आता खुद्द हरिभाऊ बागडे यांनीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे आता भाजप यावर काय भूमिका घेणार आहे, हे पाहणही महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com