Santosh Bangar : आम्ही केलेली युती पाहून बाळासाहेबांनीही पुष्पवृष्टी केली असले..

संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांच्या संदर्भात वापरलेली भाषा रेडे, भडवे म्हणणे सामान्य शिवसैनिकाला अजिबात आवडलेले नाही. त्यांनी आपल्या तोंडाला लगाम घातला पाहिजे. (Mla Santosh Bangar)
Mla Santosh Bangar-Let.Balasaheb Thackeray
Mla Santosh Bangar-Let.Balasaheb ThackeraySarkarnama

हिंगोली : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी मी त्यांच्या बाजूने मतदान केले. दोन दिवसांपुर्वी मीच हिंगोलीत (Hingoli) शिवसैनिकांनी केलेल्या सत्काराच्यावेळी बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. शिवसेनेशी गद्दारी करू नका, उद्धव साहेब तुम्हाला मोठ्या मनाने माफ करतील असेही म्हणालो. तेही मनापासून पण नंतर स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांनीची मला शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, तुम्ही शिंदेसोबतच जा असा आग्रह केला होता. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी मी शिंदे यांच्यासोबत गेलो, असा खुलासा कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Mla Santosh Bangar) यांनी केला.

विश्वासदर्शक ठरावाच्या आदल्यादिवशी विधासभा अध्यक्ष निवडीच्यावेळी संतोष बांगर यांनी (Shivsena) शिवसेनेसोबत राहत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले होते. पण चोवीस तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी ते शिंदे गटाला जाऊन मिळाले, त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वानाच धक्का बसला. बांगर यांचा मतदारसंघातील रडतांनाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करत त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांच्या मतदारसंघात देखील आश्चर्य व्यक्त केले गेले.

पण आता स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिंकाच्या आग्रहामुळेच आपण शिंदे यांच्यासोबत गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी भाजपसोबत केलेली युती पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी देखील पुष्पवृष्टी केली असेल असेही बांगर म्हणाले. बंडखोरीनंतर बांगर मतदारसंघात परतले तेव्हा त्यांचे समर्थकांनी स्वागत केले. त्यानंतर आपण ही भूमिका का घेतली? याबद्दलचे स्पष्टीकरण त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केले.

बांगर म्हणाले, एकनाथ शिंदे हे अर्ध्यारात्री आमदारांचा फोन घ्यायचे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. त्यांचा आम्हा सगळ्या आमदारांना आधार वाटत होता. तर दुसरीकडे ज्या राष्ट्रवादी व काॅंग्रेस सोबत उद्धव साहेबांनी सरकार बनवले होते, तीच राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघाली होती. अजित पवारांनी शंभर प्लसचे लक्ष ठेवले होते. निधी दिल्याचा खोटा दावा ते करत आहेत, माझ्या मतदारसंघात ४० कोटींच्यावर निधी दिल्याचे सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान देखील बांगर यांनी दिले.

Mla Santosh Bangar-Let.Balasaheb Thackeray
Bjp : खासदार चिखलीकरांची चव्हाणांवर टीका, पण एका गोष्टीसाठी केले कौतुक..

संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांच्या संदर्भात वापरलेली भाषा रेडे, भडवे म्हणणे सामान्य शिवसैनिकाला अजिबात आवडलेले नाही. त्यांनी आपल्या तोंडाला लगाम घातला पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजूनही विचार करावा, सगळी परिस्थिती पुर्वीसाऱखी होऊ शकते, असेही बांगर म्हणाले. आपण बंडखोरी केलेली नाही, अजूनही शिवेनेतच आहोत, आमचे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, हे सांगायला देखील बांगर विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in