तेरणा कारखाना सावंतांनी घेतला, पण देशमुखांच्या आक्षेपाने बाॅयलर थंडच

कारखाना भैरवनाथ शुगर्सकडे भाड्याने देण्याची प्रक्रिया पुर्ण झाली. त्यावेळी स्पर्धक म्हणुन असलेल्या अमित देशमुख यांच्या ट्वेंटी वन शुगर्सने या प्रक्रियेवर शंका उपस्थित केली. (Osmanabad District)
Tanaji Sawant-Amit Deshmukh Osmanabad

Tanaji Sawant-Amit Deshmukh Osmanabad

Sarkarnama

उस्मानाबाद ःतेरणा कारखाना भाड्याने देण्याच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत ट्वेंटी वन शुगर्सने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. (Tanaji Sawant) त्यावर खंडपीठाने ही याचिका फेटाळली असली तरी कर्जवसुली न्यायधीकरणाकडे जाण्याचे आदेश संस्थेला दिले आहेत. (Amit Deshmukh) तोपर्यंत सात दिवस तेरणा कारखान्याच्याबाबतीत कोणतीही कार्यवाही न करण्याचे सांगण्यात आले. (Osmanabad) त्यामुळे तेरणा कारखान्याच्यामागचे शुक्लकाष्ट काही अजुन संपत नसल्याचे चित्र आहे.

मोठ्या अडचणीनंतर तेरणा कारखाना शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरवा भाड्याने देण्याची प्रक्रिया सूरु झाली तिथेही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सहावेळा निविदा प्रसिध्द केल्यानंतर शेवटी कारखाना भैरवनाथ शुगर्सकडे भाड्याने देण्याची प्रक्रिया पुर्ण झाली. त्यावेळी स्पर्धक म्हणुन असलेल्या अमित देशमुख यांच्या ट्वेंटी वन शुगर्सने या प्रक्रियेवर शंका उपस्थित केली.

नियमाप्रमाणे वेळेत निविदा जमा करण्यात आली होती, बँकेने ती वेळेत आली नसल्याचे सांगुन त्यांना प्रक्रियेतुन बाहेर केल्याचा आरोप केला आहे. ट्वेंटी वनकडुन बेकायदेशीरपणे केलेल्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवून थेट न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याचे दिसत असले तरी पण त्याचवेळी कारखान्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येऊ नये असे न्यायालयाने सांगितले आहे.

त्यामुळे पुन्हा तेरणाची प्रक्रिया अडचणीत आल्याचे दिसुन येत आहे. अशावेळी कारखाना लवकर सूरु व्हावा, अशी अपेक्षा बाळगुन असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. जिल्ह्यातील हा महत्वाचा पण सध्या अडचणीत सापडलेला कारखाना मोठ्या प्रयत्नानंतर सूरु होईल अशी आशा निर्माण झाली होती.

कारखान्यावर सव्वा तीनशे कोटी रुपयाचे कर्ज असल्याने बँक देखील अडचणीत सापडली होती. हा कारखाना सूरु झाल्यानंतर बँक देखील तोट्यातुन बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण कारखान्यासमोर आलेल्या कायद्याचा गुंता सुटायला किती दिवस लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यावरच पुढील काळात कारखान्याचे भविष्य देखील अवलंबुन असणार आहे.

<div class="paragraphs"><p>Tanaji Sawant-Amit Deshmukh Osmanabad</p></div>
बारा आमदार निलंबित असताना अध्यक्षपदाची निवडणूक कशी घेता ?

दरम्यान, ट्वेंटीवन शुगर्सने न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांना पुढे कर्ज वसुली न्यायाधीकरणाकडे जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यावर कर्ज वसुली न्यायाधीकरणाकडे ते जाणार का? शिवाय तिथे गेल्यानंतर काय निर्णय होणार यावरच तेरणा आणि त्या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबुन असणार आहे.

तेरणा बचाव संघर्ष समितीने आज अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांचा विचार करून न्यायालयात जाऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे कारखाना सुरू होऊ शकणार नाही. जे करायचे होते ते निविदा प्रक्रियेच्या वेळीच करायला हवे होते. आता वाद घालून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, असे आवाहन समितीने अमित देशमुख यांना केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com