Sawant : युतीत लढले आणि अचानक वेड्याचा झटका आल्यासारखे राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले..

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवत राज्यात राष्ट्रवादी बरोबर आणि लातूरात देशमुखांबरोबर संधान साधले. (Minister Tanaji Sawant)
Minister Tanaji Sawant-Uddhav Thackeray News Latur
Minister Tanaji Sawant-Uddhav Thackeray News LaturSarkarnama

लातूर : शिवसेना आणि भाजप २०१९ मध्ये युती करून लढले, लोकांनी दोन्ही पक्षाला भरभरून मतदान केले. पण अचानक वेड्याचा झटका यावा तसे हे अचानक उठले आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, असा टोला आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. ९५ ते ९९ मध्ये देखील राज्यात युतीचे सरकार होते, तेव्हा बाळासाहेबांना वाटले नसेल का, की आपल्या मुलाला मुख्यमंत्री करावे. पण त्यांनी विचार सोडला नाही, अशी टीका देखील सावंत यांनी केली.

लातूर (Latur) येथे आयोजित हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात सावंत यांनी घणाघाती भाषण केले. बीडमध्ये बाळासाहेबांचा फोटो वापरण्यावरून केलेल्या टीकेला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आज लातूरमध्ये देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सावंत म्हणाले, लातूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आतापर्यंत खूप हालअपेष्टा सहन केल्या. पण यापुढे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारी शिवसेनाच जिल्ह्यात दिसेल. तेव्हाच्या पक्षप्रमुखांनी जिल्ह्यातील शिवसेना कायम गढीच्या दावणीला बांधली होती, पण आताचे पक्षप्रमुख कणखर भूमिका घेणारे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण करू. अशा गढ्या उद्धवस्त करायची आम्हाला सवय आहे.

Minister Tanaji Sawant-Uddhav Thackeray News Latur
Aurangabad : स्वातंत्रदिनी भुमरेंच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तेव्हाच पालकमंत्री पदावर शिक्कामोर्तब..

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवत राज्यात राष्ट्रवादी बरोबर आणि लातूरात देशमुखांबरोबर संधान साधले. त्यामुळे प्रामाणिक शिवसैनिक कायम भरडला गेला, पण आता त्यांना त्यांची जागा दाखवणार. देशमुख यांनी आता रस्त्यावर उतरत राजकारण करून दाखवावे असे आव्हान देखील सावंत यांनी यावेळी दिले. बाळासाहेबांचे विचार घेऊन काम करणारी ही शिवसेना आता नवीन पद्धतीने काम करणार असल्याचेही सावंत यांनी ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com