मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मुक्तीसंग्रामदिनाच्या पुर्वसंध्येलाच सत्याग्रह..

हक्काचे पाणी दिले नाही, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर एक लाख शेतकरी व नागरिकांना घेऊन घेराव घालणार. (Aurangabad News)
Marathwada Bahujan Vikas Agahdi News, Aurangabad
Marathwada Bahujan Vikas Agahdi News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असला तरी आजही मराठवाडा हा भाग अविकसित आहे. (Marathwada) मराठवाड्याला आपल्या हक्काच्या पाणी पासून वंचित राहावे लागत आहे. याला येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केला. (Water) तसेच मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या पुर्वसंध्येलाच बैठा सत्याग्रह करण्याची घोषणा केली.

पाणी प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना रमेश गायकवाड म्हणाले, मराठवाड्यातील शेतकरी व नागरिकांना केवळ जायकवाडी धरणाच्या नैसर्गिक पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दरम्यान १० एप्रिल १९६९ ला पाणी निवाडा लवादाची स्थापना झाली. (Aurangabad) या पाणी निवाडा लवादाने महाराष्ट्र राज्याला १०८९ अब्ज घनफुट पाणी दिले.

या पाणी हिस्स्यानुसार मराठवाड्याला ५०० अब्ज घनफूट पाणी ऐवजी २७४ अब्ज घनफुट पाणी दिले. तर विदर्भाला ४५८ अब्ज घनफूट पाण्याऐवजी ६७४ अब्ज घनफुट पाणी अतिरिक्त दिले गेले. उर्वरित महाराष्ट्राला १३१ अब्जफूट पाण्याऐवजी १४१ अब्ज घनफूट पाणी दिले गेले. याविषयी पाणी वाटप पद्धतीने मराठवाड्याला हक्काचे २८६ अब्ज घनफूट पाणी मिळालेच नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो.

दरम्यान मध्य गोदावरीतील २८.८५ टीएमसी पाणी मंजूर असतानाही ते अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्याला द्यावे, तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागात तब्बल सहा हजाराहून अधिक शाखा अभियंत्याची पदे रिक्त आहेत ती सरळसेवा भरतीअंतर्गत तात्काळ भरावी, अशी मागणी देखील गायकवाड यांनी केली.

Marathwada Bahujan Vikas Agahdi News, Aurangabad
Marathwada: गोगलगायीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी तीन जिल्ह्यांना ९८ कोटींची मदत..

मराठवाड्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला पाटबंधारे विभागासमोर बैठा सत्याग्रह करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. शिवाय एक जानेवारीपासून संपूर्ण मराठवाड्यात जनजागृती करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून आमच्या हक्काचे पाणी दिले नाही, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर एक लाख शेतकरी व नागरिकांना घेऊन घेराव घालण्यात येईल, असा इशारा देखील गायकवाड यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in