Agriculture Minister : सत्तार जर्मनी दौऱ्यावर, कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी करणार प्रयत्न..

Marathwada : परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात कशी आणता येईल व सेंद्रिय शेतीची भरभराट कशी होईल, यावर त्यांचा भर असणार आहे.
Minister Abdul Sattar News, Aurangabad
Minister Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Maharashtra : सेंद्रीय पद्धतीने शेती करणे हे जमिनीस पोषक ठरते. तसेच सेंद्रिय शेती किफायतशीर व आरोग्यासाठी उत्तम असल्याने ह्याची मागणी दिवसोंदिवस वाढत आहे. (Agriculture) याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिषद व सर्वात मोठा ऑरगॅनिक व्यापार मेळावा जर्मनी येथे होणार आहे.

Minister Abdul Sattar News, Aurangabad
Supriya Sule News : सुसंस्कृत फडणवीसांना बिनबुडाचे आरोप करणे शोभत नाही..

यात सहभागी होण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व कृषि आयुक्त सुनील चव्हाण हे जर्मनी दौऱ्यावर जात आहेत. (Marathwada) १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी ते प्रयत्न करणारआहेत.

`इंटरनेशनल फेडरेशन ऑफ ऑर्गेनिक एग्रीकल्चर मूवमेंट` या परिषदेला उपस्थित राहून सत्तार न्यूरेमबर्ग सेंद्रिय आणि व्यापार मेळा ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. या निमित्ताने ठीकठिकाणच्या सेंद्रीय शेती प्रकल्प व त्यावर आधारित उद्योगाला भेट देऊन कृषी मंत्री व राज्य कृषी आयुक्त ही पद्धत आपल्याकडे कशी अवलंबली जाईल या दृष्टीने अभ्यास करणार आहेत.

परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात कशी आणता येईल व सेंद्रिय शेतीची भरभराट कशी होईल, यावर त्यांचा विशेष भर असणार आहे. राज्याचे कृषीमंत्री झाल्यानंतर सत्तार हे आधुनिक व सेंद्रीय पद्धतीच्या शेतीसाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांना संशोधनावर जोर देण्यास सांगितले आहे.

पीक पद्धती, बियाणे आदी गोष्टींमध्ये काळानूरूप आणि हवामानातील बदल लक्षात घेवून पद्धत अवलंबली पाहिजे, यासाठी देखील ते आग्रही आहेत. नुकताच त्यांनी आपल्या मतदारसंघात राज्यस्तरीय कृषी महोत्सव भरवला होता. या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य आणि देशभरातील कृषी तज्ञांचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com