
Aurangabad Political News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी नुकतीच अर्जुन गाढे पाटील यांची नियुक्ती झाली. त्यानंतर आज झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve News) यांनी त्यांना सावधानतेच्या इशारा दिला. अर्जुन गाढे हे अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक आहेत. उपाध्यक्षपदावरून त्यांची अध्यक्षपदी वर्णीदेखील सत्तार यांच्या आशीर्वादानेच लागली.
हाच धागा पकडत दानवे यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली. अर्जुन गाढे तुम्ही जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष झालात, पण शिक्काधारी बनू नका. नाहीतर (Abdul Sattar) सत्तार म्हणतील तिथे मार शिक्का, मार कोंबडा असे करू नका. (Shivsena) पुढे काही झाले तर मैने नही किया, अर्जुनने किया अस म्हणायलादेखील ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा टोला दानवे यांनी लगावला. तेव्हा सभेसाठी उपस्थित सगळ्यांनीच टाळ्या वाजवून दाद दिली.
जिल्हा बॅंकेच्या कारभारात गेल्या आठवड्यात मोठ्या घडामोडी घडल्या. (Marathwada) अडीच वर्षांपूर्वी अब्दुल सत्तार महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी ही जिल्हा बॅंक शिवसेनेच्या ताब्यात आणली. माजी आमदार आणि संचालक नितीन पाटील यांन सत्तार यांनी अध्यक्ष करत सूत्रे आपल्या हाती ठेवली. पण नंतर सत्तार आणि पाटील यांचे बिनसले तसेच त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.
त्यानंतर झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्ष असलेल्या अर्जुन गाढे यांना अध्यक्षपदी बढती देण्यात आली. सत्तारांनी निर्णय घेतला आणि बाकीच्या संचालकांनी त्याला संमती दिली. अंबादास दानवे हे बॅंकेचे संचालक असले तरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला ते हजर नव्हते. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मात्र त्यांनी हजेरी लावली आणि आपल्या भाषणातून सत्तार आणि त्यांनी नेमलेल्या अध्यक्षांवर चांगलीच टोलेबाजी केली.अर्जुन गाढे पाटील यांचे अभिनंदन तर केलंच पाहिजे, पण माजी अध्यक्ष नितीन पाटील यांनीदेखील त्यांच्या काळात चांगले काम केले, त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे.
अर्जुन गाढे तुम्ही अध्यक्ष झालात, पण शिक्काधारी बून नका. नाही तर सत्तारांनी सांगितलं की मार शिक्का, मार कोंबडा असा कराल तर अडचणीत याल. उद्या काही झालंच तर सत्तार `मैने नही किया, अर्जुन ने किया`, असं म्हणायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, असा सावधानतेची इशारा त्यांना दिला. पुढे असं काही झालंच तरी मी तुमच्या पाठीशी आहे, हे सांगायलाही दानवे विसरले नाहीत. अब्दुल सत्तार यांच्यासमोरच दानवे यांनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांना सावध केल्याची चर्चा या निमित्ताने सभेते सुरू झाली होती.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.