Abdul Sattar News : पंचवीस वर्षापासून सत्तार साजरी करतात बंजारा समाजासोबत होळी..

Marathwada : सत्तार यांनी देखील हलगी वाजवत होळी आणि रंगपंचमीचा आनंद लुटला.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दरवर्षीप्रमाणे सोयगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांसोबत (Holi) होळी - रंगपंचमी सण साजरा केला. गेल्या २०-२५ वर्षांपासून सत्तार सोयगाव तालुक्यातील वाडी, तांड्यात पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या होळीच्या कार्यक्रमात सहभागी होतात.

Abdul Sattar News
Imtiaz Jalil News : `हम इतने भी शरीफ नही`, नामांतराविरोधात गुरुवारी कॅन्डल मार्च ...

या वर्षीही होळी निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होऊन तसेच सोयगाव येथील मित्रांच्या घरी सदिच्छा भेट त्यांनी होळी साजरी केली. तालुक्यातील अनेक गांवाना सत्तार (Abdul Sattar) यांनी आज भेट देत नागरिकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. (Shivsena) यावेळी त्यांचे औक्षण करून तर काही ठिकाणी वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

येथील होळी सणाला पारंपरिक व प्राचिन प्रथा आहे. होळी निमित्त हातात हलगी घेवून पारंपरिक बंजारा गीतांवर पुरुष तसेच महिला भगिनींकडून नृत्य सादर केले जाते. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. सत्तार यांनी देखील हलगी वाजवत होळी आणि रंगपंचमीचा आनंद लुटला.

राज्याच्या विविध भागात काल गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत देखील मतदारसंघातील पारंपारिक सणांना हजेरी लावत त्यांनी नागरिकांचा उत्साह वाढवला. सत्तार हे गेल्या वीस वर्षापासून सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सोयगांव तालुका कायम सत्तार यांच्या पाठीशी खंबीर उभा राहत असल्याने त्यांचे देखील या तालुक्यावर आणि येथील नागरिकांवर विशेष लक्ष असते. त्यामुळे राज्यात गारपीट आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे नुकसान झालेले असतांना देखील त्यांनी बंजारा समाजाच्या आग्रहाखातर होळी आणि रंगपंचमी सणात सहभाग नोंदवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com