Shivsena : जावयाला कंत्राट मिळवून दिल्याचे आरोप होताच भुमरेंच्या मदतीला सत्तार धावले..

ब्रम्हगव्हाण योजेनेचे मुळ कंत्राट ज्या व्यक्तीला मिळाले होते, त्याच्याकडून भुमरेंच्या जावयाने रीतसर खरेदीखत केलेल आहे. (Minister Abdul Sattar)
Minister Sandipan Bhumre-Abdul Sattar News, Aurangabad
Minister Sandipan Bhumre-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या पैठण मतदारसंघातील महत्वाकांक्षी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट आपल्या जावयाला मिळवून दिल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. (Shivsena) आधीचे कंत्राट रद्द करून जावयाला कंत्राट देणाऱ्या भुमरेंची चौकशी करा, अशी मागणी देखील दानवे यांनी केली. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे भुमरेंच्या मदतीला धावून आले आहेत.

भुमरेंच्या जावयाला कंत्राट मिळाले तर त्यात वावगे काय आहे? त्यांनी काम घेऊ नये का? काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे, पण जावयाला कंत्राट मिळाले म्हणून आक्षेप घेण्यात काय अर्थ? असा सवाल करत सत्तारांनी भुमरेंची पाठराखण केली. (Marathwada) अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ब्रम्हगव्हाण उपसा सिंचनच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

शिवाय या योजनेच्या कामाचे आधी दिलेले कंत्राट रद्द करून ते आपल्या जावयाला दिल्याचा दावा देखील दानवे यांनी काही कागदपत्रे जाहीर करत केला आहे. भुमरे यांची यावर प्रतिक्रिया आली नसली तरी शिंदे सरकारमधील कृषीमंत्री व भुमरे यांचे सहकारी अब्दुल सत्तार यांनी मात्र त्यांची पाठराखण करत दानवेंचे आरोप फेटाळले आहेत.

एखादी व्यक्ती फक्त ती राजकारण्याची किंवा मंत्र्याची नातेवाईक आहे म्हणून त्याला कंत्राट मिळू नये का? त्यांनी कामच करू नये असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे? संबंधित कंत्राटदार कुणाचा जावई आहे हे पाहण्यापेक्षा त्याने केलेले काम उत्तम दर्जाचे कसे होईल हे बघितले पाहिजे, असा टोला देखील सत्तार यांनी दानवे यांना लगावला.

Minister Sandipan Bhumre-Abdul Sattar News, Aurangabad
Sanjay Shirsat : नाराजीच्या बातम्या द्याल तर मानहानीचा दावा दाखल करणार..

ब्रम्हगव्हाण योजेनेचे मुळ कंत्राट ज्या व्यक्तीला मिळाले होते, त्याच्याकडून भुमरेंच्या जावयाने रीतसर खरेदीखत केलेल आहे. परंतु अशा प्रकारे खरेदीखत करता येत नाही. हा प्रकार गंभीर असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com